Type Here to Get Search Results !

शेंदुर्णी नगरपंचायतमध्ये निविदा अटीशर्ती भंग करून विकास कामांमधून राजरोस निधीची लूट ..युवा नेते स्नेहदीप गरुड व राष्ट्रवादीचे नगरसेवक यांचा आरोप.

 


शेंदुर्णी  ( प्रतिनिधी) -:-   येथील नगर पंचायतीने ४ कोटी विशेष रस्ता अनुदान योजनेतून १५ रस्त्यांच्या कामांसाठी अटी शर्तीसह निविदा प्रसिद्ध करून  ठेकेदाराला काम दिले सदर निविदा अटी शर्ती नुसार ठेकेदाराने स्वतःचा रेडी मिक्स सिमेंट प्लांट(आरएमसी) वरून रेडी मिक्स सिमेंट आणून रस्ते करणे आवश्यक आहे.अश्याच ठेकेदाराने निविदा भरावी ही मुख्य अट आहे. परंतु या निधीतून प्राध्यापक कॉलनी, शिवदत्त नगर भागात प्रत्यक्ष रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली असून तिथे रेडी  मिक्स सिमेंट ऐवजी साद्या मिक्सर फ्यूरी मशीनने रस्ते बनविले जात आहेत तसेच  निविदेतील अटी नुसार कामाच्या ठिकाणी आवश्यक मशनरी नाहीत व अंदाज पत्रकातील तरतूदी नुसार ६ इंच रस्ते खोदून माती काढून आधी मुरूम त्यावर खडी पुन्हा मुरूम भराई करून रोलर ने दाबाई करणे त्यासाठी १८४ ब्रास मुरूम वापरणे आवश्यक असताना अंदाज पत्रकात असलेला मुरूम प्रत्यक्षात कामातून गायब झाला.  त्यावर ४ इंची कच्चा थर २ इंचवर आला आहे .रेडी  मिक्स प्लांट मधून आलेल्या मटेरियल मधून एम थर्टी लेयर मध्ये रस्ते होणे आवश्यक आहे ती प्रक्रिया न करता नुसती खडी पसरवून साधे फ्यूरि मिक्स सिमेंटचा एक थर दिला जात आहे. कामावर नगर पंचायतचे बांधकाम विभाग अभियंता तर सोडा ठेकेदार व त्याचे कंपनी सुपर वायझर सुध्दा हजर नाही.माहिती घेतली असता ठेकेदाराचे नावावर फक्त निविदा भरलेली असून सर्व बोगस कामे नगर पंचायत पदाधिकारी यांचे देखरेखीत सुरू आहे. 


या आधीही अशीच कामे करण्यात आली असून सदर ४ कोटी विशेष रस्ता अनुदान मंजूर निधीच्या कामांचे सर्व कागदपत्रे माहिती अधिकारात फी भरून आधीच काढण्यात आल्यामुळे यावेळी सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे सुरू असलेल्या कामांसंबंधी  नगर पंचायत मुख्याधिकारी यांचेकडे तक्रारी करूनही ते भूमिका घेऊन रस्ते कामात भ्रष्टाचार करायला वाव देत आहे. 


यामुळे जनतेला उत्कृष्ठ रस्ते देण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निधीवर राजरोसपणे डल्ला मारला जात आहे विशेष रस्ता अनुदान निधीची लूट होत असल्याने  जिल्हाधिकारी जळगांव यांनी निविदा अटी शर्तीचां भंग करून होणाऱ्या बोगस कामांचे देयके अदा न करण्या विषयी नगर पंचायत मुख्याधिकारी व बांधकाम इंजिनियर यांना लेखी आदेश द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादीचे स्नेहदीप संजय गरूड व राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी केली आहे

Post a Comment

0 Comments