शंकर भारंबे ,पहूर , ता . जामनेर ( ता . ३० ) पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद भागवत पांढरे यांची निवड झाली .
जामनेर तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या पेठ ग्रुप ग्रामपंचायतीची ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली होती . यात राष्ट्रवादी काँग्रेसचा ११ जागांवर विजय झाला होता तर सरपंच पदी अबू तडवी यांच्यासह भाजपचे ७ उमेदवार निवडून आले होते .
दरम्यान आज गुरुवारी ( ता . ३० ) पहूर पेठ , सांगवी , खर्चाणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सभागृहात दुपारी उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली .राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शरद पांढरे व राजू जेंटलमन यांनी तर भाजपतर्फे महेश पाटील व हिना कौसर अशा चौघांनी अर्ज दाखल केले .
राजू जेन्टलमन व महेश पाटील माघार घेतल्याने अखेरीस शरद पांढरे व हिना कौसर बी शेख यांच्यात मतदान झाले . शरद पांढरे यांना ११ तर हिना कौसर यांना ७ मते मिळाली .पिठासीन अधिकारी ऋषिकेश जाधव , निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी डी . पी . टेमकर उपस्थित होते . सभेचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच अबू तडवी निवड सरपंच पदी शरद पांढरे यांची निवड झाल्याची घोषणा केली .
शरद पांढरे यांचे पॅनल प्रमुख प्रदीप लोढा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिनंदन केले .कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला .



Post a Comment
0 Comments