शंकर भारंबे पहूर , ता . जामनेर ( ता . ३० ) पहूर कसबे ग्रामपंचायत कार्यालयात आज गुरुवारी ( ता . ३० ) सकाळी दहा वाजता सरपंच सौ आशा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली .
घरकुल योजने संदर्भात माजी सरपंच शंकर जाधव यांनी माहिती दिली . पहूर येथील श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे लोकसहभागातून मंदिर परिसर विकासाचे कार्य सुरू आहे . येत्या कालावधीत विविध विकास कामे केली जाणार असून महाशिवरात्रीला भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे सहसचिव शंकर भामेरे यांनी सांगून श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टला ग्रामपंचायतीने विकास कामांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करून त्यांनी शासन दरबारी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तसेच प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर परिसराचा कायापालट केला जाणार असल्याचे सांगितले . केळी पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी ग्राम रोजगार सेवक सुदाम राऊत यांच्याकडे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक देऊन नोंदणी करण्याचे आवाहन कृषी सहाय्यक यांनी केले .
महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अर्जुन आप्पा लहासे , माजी सरपंच तथा ट्रस्टचे विश्वस्त माधवराव घोंगडे , ग्रामपंचायत सदस्य तथा विश्वस्त अशोक जाधव , ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे , शिवाजी राऊत , दिनकर पवार , उत्तम उबाळे , विश्वनाथ घोंगडे , विश्वस्त किशोर बनकर , ट्रस्टचे सचिव हरिभाऊ राऊत , ईश्वर हिवाळे , सावित्रीबाई पाटील यांच्या ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.अमरावती येथे झालेल्या खेलो मास्टर्स २०२३
राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत ब्रांझ मेडल प्राप्त केल्याबद्दल सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक हरिभाऊ राऊत यांचा सरपंच आशा जाधव यांच्यासह मान्यवरांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला .
सुनील उबाळे , प्रकाश घोगडे , किरण पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .



Post a Comment
0 Comments