कृष्णा पाटील ,तोरणाळे -:- जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील कापूसवाडी रोडवर असलेल्या आरोग्य उपकेंद्रत देऊळगाव गुजरी तोरणाळे ,पळसखेडा, घाणेगाव, या गावातील गरोदर महिलांची दि. २३ रोजी आरोग्यावर्धनी उपकेंद्र येथे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत गरोदर माता तपासणी. व बालकांची तपासणी करण्यात आली तसेच कुष्ठ रोग व क्षय रोग मोहीम अंतर्गत रुग्णाची तपासणी देखील करण्यात आली...
सदर कार्यक्रमास कर्तव्यदक्ष तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, वैधकीय अधिकारी डॉ पल्लवी राऊत यांनी गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली असून महिलांना बालसंगोपन मार्गदर्शन देखील करण्यात आले. यावेळी उपस्थित डॉ सागर सोनाळकर ; समुदाय आरोग्य अधिकारी, डॉ शामल इंगळे समुदाय आरोग्य अधिकारी , पर्यवेषक वानखेडे नाना आरोग्य सेविका वाहूळे सिस्टर, कल्याणकर सिस्टर, लॅब मनिषा ताई,व विशाल भाऊ,आरोग्य सेवक विजय पवार ,सुनील पाटील, सपकाळे भाऊ, प्रवीण मोर रुग्णवाहीका चालक भैया भाऊ सर्वांचे आरोग्यवर्धनी उपकेंद्र देऊळगाव यांच्या माध्यमातून उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्याचे काम सुरु आहे .व आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देऊळगाव गुजरी आरोग्यवर्धनि उपकेंद्रात आलेल्या गरोदर महिलांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले..




Post a Comment
0 Comments