कठीण समय येता कोण कामास येतो या युक्तीप्रमाणे आज टाकळी येथिल बेघर निराधार वृद्ध महिला लयजाबाई महादू चव्हाण यांना आर्थिक मदत करतांना मनस्वी आनंद झाला अशी भावना आज किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आर्थिक मदत देतांना व्यक्त करण्यात आली. तसेच त्यांना लवकरात लवकर इंदिरा आवास योजनेतून घरकूल मंजूर करून संजय गांधी निराधार योजना मधुन मासिक वेतन चालू करून देण्याचे आश्वासन दिलेप्रश्न आहे तर उत्तर असायलाच पाहिजे त्यानुसार माणसावर जेव्हा कठीण वेळ येते तेव्हा त्याने आधी करून ठेवलेले कर्म कामाला येते म्हणजेच त्याचा व्यवहार, त्याने जनमानसात बोलण्यातुन वागण्यातून मिळवलेली माणुसकी, दुःखी, पीडीत व्यक्तीला दिलेला मदतीचा हात, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी तर सुखात आनंदी, भुकेल्याला अन्नाचा घास तर तहानल्याला पाणी ही सर्व कर्मे फिरून माघारी येतात हे खरे आहे.
टाकळी येथील या निराधार वयोवृध्द महिलेचा विषय आमदारांच्या काणी येताच आमदार साहेबांनी त्या महिलेच्या घरी भेट देत उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत दिली. त्यावेळी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, सरपंच काबा अण्णा मालदे, बाप्पु शेळके, सुनिल शेलार, बचत गटाच्या अंजली ताई चव्हाण, सोनू परदेशी, संदिप पाटील, सीआरपी हिराबाई सोनवणे सह किशोर आप्पा पाटील बहुउद्देशिय संस्था पाचोरा यांचे पदाधिकारी उपास्थित होते.





Post a Comment
0 Comments