Type Here to Get Search Results !

भर दिवाळीच्या सिजन मध्ये जामनेर येथे साईनाथ प्रोव्हीजनला भीषण आग--आगीत लाखोंचा माल जळून खाक



जामनेर -:- जामनेर येथे असलेले वैभव प्लाझा मार्केट मधील दुकान नं१० साईनाथ प्रोव्हीजन या दुकानाला आज दि.१४ रोजी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली असून या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे.दुकानाचे मालक ‘प्रल्हाद कुमावतआहे .

ही आग इतकी भीषण होती की, आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले.आहे.दुकानात काही रुपयांची रोकड रक्कम असल्याने ती पण सुद्धा जळून खाक झालेली आहे.

दुकानाला हळूहळू आग लागल्याने ती काही क्षणातच तिव्रस्वरुपात रूद्र रूप धारण केले.आगीत दोन चिमुकले मुलांचे प्राण वाचले असे आढळून आले ले होते.

मिळालेल्या माहितीनुसार दुकानातील सर्व किराणा माल,जनरल साहित्य,शालेय साहित्य वस्तु आगीत जळून खाक झाल्या आहेत.

जामनेर शहरातील आठवडे बाजार रोडाने असलेले वैभव प्लाझा मार्केटमध्ये.या दुकानाला आग लागली आहे दरम्यान शेजारील दुकानांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही व जिवीत हानी टळलेली असे दिसून आले.  

आगीवर नियंत्रण मिळवण्यात उशीर झाल्यामुळे घटनेठिकाणी अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली व काही काळानंतर आग अटोक्यात आली. 

भीषण आगीत १००टक्के नुकसान झाले आहे. दुकानातील सर्व साहित्य जळाले आहे..तरी यांना शासनाने नुकसान भरपाई भरून देण्याची ग्वाही जामनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी दिली.



Post a Comment

0 Comments