Type Here to Get Search Results !

1 लाख 32 हजारांचा कापूस चोरी, पाचोरा !!! बामरुड राणीचे येथील घटना...शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.




 सध्या चोरीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या वर्षी अगोदरच शेतकऱ्यांच्या उत्पादनात 50 %पेक्ष्या जास्त घट आहे. त्यामुळे शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या  सुगीचे दिवस चालू आहे.शेतकरी बांधवांनी पण शेतातील  आपल्या शेत मालाची काळजी घ्यायला हवी.

पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथील शेतकरी दगडू गवळी यांचे शेतातील कापूस चोरी  शेड मधून 22 क्विंटल सुमारे 1लाख 32 हजार रुपये किमतीची कापूस चोरून नेल्याची घटना उघडकीस

 आलेली आहे, दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजीचे रात्री 10.00 वा. ते दिनांक 02 डिसेंबर 2023 रोजीचे सकाळी 05.30 वा. चे दरम्यान दगडू गवळी वय 53 यांची राणीचे बांबरुड शिवारातील शेत गट क्रमांक 747/2 शेतातील बंद पत्र्याचे शेडमधुन कोणीतरी अज्ञात चोरटयांनी कोणत्यातरी वाहनाने 22 क्विंटल सुमारे 1 लाख 32 हजार रुपये किंमतीचा कापुस त्यांचे संमतीशिवाय चोरी करुन घेवुन गेले आहे. म्हणुन त्यांनी अज्ञात चोरटयांविरुध्द दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलिसात 3 डिसेंबर रोजी अज्ञातविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असल्याची माहिती आज दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी हाती आलेली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस विकास खैरे हे करीत आहेत,

Post a Comment

0 Comments