बाळू जोशी,-वाकडी.
वाकडी.ता.जामनेर.दि.०४/१२/२३भारत देशाला स्वातंत्र्य मिळुन 76 वर्षे झाले तरी आजही भारत देशातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज LAND LESS, HOME LESS आहे, राहायला घर नाही मरायला शमशानभुमी नाहि, जगायचे तर कसे जगायचे हा देशासमोरचा प्रश्न आहे, विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी सरकार प्रशासन कडुन कितीतरी आयोग, कमिटी आले आणि गेले पण भटक्या विमुक्तांच्या परीस्थितीत काय सुधारणा नाहि झाली, खुप सारे राजकिय पाटर्यांनी भारत देशातील ३० करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचा फक्त वोटींग, राजकारणासाठी आणि मोठ मोठी पदे मिळवण्यासाठी उपयोग केला पण विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचे अंधारापासुनचे ते प्रकाशा पर्यंतचे वाटचाल जिवन फक्त सरकारी दफ्तरी कागदावरच राहिले पण प्रत्यक्षात समाज मात्र सर्व गोष्टींनपासुन वंचितच राहिला त्यामुळे देशातील विमुक्त जाती भटक्या जमातीला अंधाराकडुन प्रकाशाकडे आणन्यासाठी, समाजाला शासक बनवण्यासाठी विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी पुर्ण जिवन वाहुन घेतलेले विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियानाचे मुख्य संयोजक संजय मारुती कदम ह्यांनी सांगितले जर खरच सरकारला देशाला जागतिक महासत्ता बनवायचे असेल तर राष्ट्रीय स्तरावर विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी स्वतंत्र कॅटेगिरी बनवावी. कारण भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र कॅटेगिरी झाली तरच खऱ्या अर्थाने विमुक्त जाती भटक्या जमातीच्या पालावर, झोपडीवर, कुल्टीवर, तांड्यावर, वस्त्यावर विकासाची गंगा येईल.
रत्नागिरी जिल्हात NT(B) आणि विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाची लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे, जिल्हात विमुक्त जाती भटक्या जमाती समाज मंडणगड, खेड, गुहागर, दापोली, चिपळुन, संगमेश्वर, लांजा, राजापुर अश्या सर्वच तालुक्यात राहतो पण समाजाकडे सरकार प्रशासन लक्ष देत नाहिए, एकीकडे सरकार दुसऱ्या वरीष्ट जातींना जातीचे दाखल्या साठी आरक्षणासाठी सरकार समिती नेमते आणि त्यांना जाती प्रमाणपत्र काढायला मदत करते मग 76 वर्षापासुन LAND LESS, HOME LESS असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला का जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी भेटत नाहि मग सरकार राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजा सोबत दुजाभाव करत आहे का? सरकार आणि प्रशासनाला आम्ही विनंती करतो जिल्हातील NT(B) कॅटेगिरी आणि विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाल कँम्प राबवुन जातीचे प्रमाणपत्र व जातपडताळणी करून मिळावे, भटक्या विमुक्त समाजाचा जन्म कधी नदी नाल्या किनारी तर कधी फुटपाथ तर कधी झोपडीवर पालावर झाला, आमचे जन्माचे पुरावे नाहित तर जन्म दखला कुठुन येणार आणि जन्म दाखलाच नाहि तर जाती प्रमाणपत्र जातपडताळणी कुठुन येणार मग हे सर्व नसल्याने विमुक्त जाती भटक्या जमाती समाज शिक्षण, आरक्षण, योजनां, विकासापासुन वंचित आहे, म्हणुन राज्यातील व देशातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकिय दृष्टया अति मागास आहे हे अनेक आयोगांनी सिध्द केलेले असताना पण राज्य सरकारला केंन्द्र सरकारने राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचा सर्वे करण्यासाठी जनगणना करण्यासाठी एक पत्र पाठवले होते, पत्र नंबर D.O.No. ११२०/२/२०२०-DWBDNC हा आहे, आणि त्यात लिहिले आहे राज्यातील विमुक्त जा. भटक्या जमाती समाजाचा सर्वे करून तो डाटा केन्द्र सरकारला पाठवा त्याचा जो काहि खर्च असेल ते केंन्द्र सरकार राज्य सरकारला देईल, पण तरी राज्य सरकार राज्यातील व जिल्हातील विमुक्त जाती भटक्या जमातीचा सर्वे करत नाहिए म्हणुन आज विमुक्त जाती भटक्या जमाति समाज क्रांति मोर्चा रत्नगिरी शहर येथे काढण्यात आला होता ह्या मोर्चाची मुख्य मागण्या होत्या राष्ट्रीय स्तरावर विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी स्वतंत्र कॅटेगिरी बनवली पाहिजे, महाराष्ट्र राज्यात NT(B) चे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे, NT(B) चे आरक्षण ५% करावे, NT(B) ला शासकिय नौकऱ्यांमध्ये जास्त जागा सुटावे, रत्नगीरी जिल्हातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला कॅम्प राबवुन जाती प्रमाणपत्र व जातपडताळणी करु मिळावी, केंन्दीय स्तरावर भटक्या विमुक्त समाजासाठी विमुक्त घुमन्तु अर्धघुमन्तु विकास आणि कल्याण बोर्ड बनवले आहे, त्या बोर्ड मार्फत सिडस् योजनेचा लाभ जिल्हातील व राज्यातील भटक्या विमुक्त समाजाला लवकर भेटावे, विमुक्त जाती भटक्या जमाती समाजास सरकारी नौकरीमध्ये जात निहाय प्रमोशन चालु करावे, आणि प्रमोशन संदर्भात सुप्रिम कोर्टात केस दाखल आहे, त्यासाठी राज्य सरकारने विशेष लक्ष देवुन राज्य सरकारी तज्ञ वकिल दयावा, जिल्हातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, तांडा वस्ती सुधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सिडस् योजना चा लाभ भेटावा, प्रत्येक योजनेला घरकुलाची रक्कम वाढवुन मिळावी, वसंतराव नाइक भटक्या विमुक्त महामंडळ, मुद्रा योजना, विश्वकर्मा योजना, लघु व सुक्ष्म उद्योग मंत्रालय, सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्राल राज्य केंन्द्र सरकारच्या, उदयोग भवनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, महाज्योतीचे सेंटर कोकणातील रत्नागिरी जिल्हामध्येहि चालु करावे, जस्टीस रोहिणी कमिशनवर पार्लमेंन्ट मध्ये चर्चा होऊन जस्टीस् रोहिणी कमिशन जनतेसाठी खुले करून जस्टीस् रोहिणी आयोग, इदाते आयोग, रेणके आयोग जशात तसे लागु व्हावे, जात निहाय जगणना लवकर सुरु व्हावे, विमुक्त जाती भटक्या जमातीच्या सर्व योजनांची १००% अंमलबजावणी व्हावी, त्यासाठी आज विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियानाचे मुख्य संयोजक संजय मारूती कदम ह्यांच्या नेतृत्वात विमुक्त जाती भटक्या जमाती समाज क्रांती मोर्चा काढण्यात आला रत्नागिरी येथे छत्रपति शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पन करुन मारूती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला, ह्या अमर वाडेकर, गोपाळ गोंधळी, दिपक भोरे, राजू इंगळे, तानाजी वाघमारे, भिमाशंकर गोंधळी, संतोष गोंधळि, भिमराव जोशी, गोपी ननवरे, प्रकाश वाघमारे, दिपक गोंधळी, शशिकांत इंगळे असे अनेक विमुक्त जाती भटक्या समाज उपस्थित होता, संजय कदम ने इशारा दिला आहे सर्व मागण्या पुर्ण नाहि झाले तर मंत्रालयवर कोकणातुन पदयात्रा काढुन धडक मोर्चा काढला जाईल.

Post a Comment
0 Comments