शंकर भामेरे ,पहूर , ता . जामनेर ( ता . १ ) येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आज शुक्रवारी (ता .१ ) जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शनी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले .
ग्रामीण रुग्णालय पहुर आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या ' रेड रिबन क्लब ' तर्फे आज जागतिक एड्स निर्मूलन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .
ग्रामीण रुग्णालयाच्या आयसीटी कक्षाच्या समुपदेशक सोनल तायडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . एड्सची कारणे , लक्षणे , परिणाम , प्रतिबंधात्मक उपायोजनांविषयी त्यांनी माहीती सांगीतली . प्रारंभी शिक्षकांनी एड्स निर्मुलनाची शपथ घेतली .
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती व्ही . व्ही . घोंगडे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले .
पोस्टर प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांनी माहीती घेतली . यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . लिंक वर्कर रजनी जैन यांचे मोलाचे सहकार्य लाभले . रेड रिबन क्लबचे अध्यक्ष शंकर भामेरे यांनी सुत्रसंचालन केले . यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले .



Post a Comment
0 Comments