Type Here to Get Search Results !

पाचोरा येथील फौजदाविरुद्ध गुन्हा दाखल.



पाचोरा येथील संशयावरून एका तरुणास बेदम मारहाण केल्याप्रकरणी पाचोरा येथील पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्याविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२२व २४ नोव्हेंबर रोजी काॅलेज ग्राउंड व सिंधी काॅलनी परिसरात उल्हासनगर येथील प्रथम संदिप गायकवाड वय १९ या तरुणास संशयावरून पाचोरा पीएसआय जितेंद्र वल्टे यांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली होती .जखमी झालेल्या तरुणानावर चार ते पाच दिवस पाचोरा येथील एका हाॅस्पीटल वर गेले उपचार सुरू होते.

भांडण सोडविण्यासाठी आलेले प्रथमचे मामा संदिप ब्राह्मणे यांनाही यावेळी मारहाण करण्यात आली.या प्रकरणी पाचोरा पोलिसात पीएसआय जितेंद्र वल्टे यांच्याविरुद्ध  कलम ३२४,३२३,५०४,५०६ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments