Type Here to Get Search Results !

लोहारा येथील डॉ.जे.जी.पंडित विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा.


धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव सोसायटी द्वारा संचलित डॉ. जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे दिनांक ६/१२/ 2023 रोजी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील उपशिक्षक  व्ही बी इंगळे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले  उपमुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम  पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे  व उपस्थित शिक्षक यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आपले. मनोगते सादर केली.  तसेच त्यांच्या कार्य विषयीची माहिती दिली यानंतर शिक्षकांमधून आर के सुरवाडे सर यांनी मनोगत व्यक्त करून बाबासाहेबांचे शैक्षणिक कार्य सांगितले तसेच पि यू खरे सर यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित गीत सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली ,त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही बी इंगळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक सुधारणा व शैक्षणिक कार्य याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील सर यांनी केले व आभार मानले  या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments