Type Here to Get Search Results !

पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ठीक ठिकाणी शिबिर!!



कृष्णा पाटील  तोरणाळे  .-:-  जामनेर तालुक्यातील तोरणाळा येथे पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान अंतर्गत प.वै.द.दवाखाना देऊळगाव गुजरी अंतर्गत तोरनाळे येथे दिनांक 08/12/2023 शुक्रवार रोजी वंध्यत्व निवारण शिबिर घेण्यात आले असून कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांकडे असलेली रिकामी जनावरे जसे की गाभण न राहणाऱ्या गाई-म्हशी  तसेच शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांबद्दल मार्गदर्शनपर शिबीर घेऊन शिबिराच्या वेळी पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती जामनेर डॉ.स्वप्नजा लोखंडे,  प.वै.द.देऊळगाव पशुधन पर्यवेक्षक एस.टी.चव्हाण,  डॉ.अमित सओमकउवर, प.वै.द.मोलखेडा, डॉ तेजमल इंगळे, प.वै.द.कापुसवाडी, डॉ.गजानन बिनगाळे, प.वै.द.बेटावद , डॉ.निलेश बावस्कर, प.वै.द.शेलवड तसेच खाजगी पशुवैद्यक डॉ.अनिल लेनेकर, डॉ.महेंद्र सुरळकर, डॉ.प्रेम उपस्थित होते व त्यांनी माजावर येत नसलेली व गाभण राहत नसलेल्या गायी म्हशींना तपासणी करून औषधोपचार दिले तसेच डॉ.स्वप्नजा लोखंडे पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती जामनेर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले .


यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच शेतकरी बांधव, ग्रामस्थ व पत्रकार बंधु कृष्णा पाटील यांनी उपस्थित राहुन सदर शिबिर संपन्न होण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

Post a Comment

0 Comments