बायका माहेरी गेल्या आणि दोन भावांनी दुसरे लग्न केलं पिंपळनेर पोलीस स्टेशनची घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील देश शिरवाडे या गावातील दोन सख्ख्या भाऊ बरोबर दोन्ही सख्ख्या बहिणीचे लग्न झाले होते मात्र विवाह झाल्यानंतर दोन्ही भावांनी विवाहितेचा छळ सुरू केला छळाला कंटाळून दोन्ही बहिणी आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून गेल्या त्यानंतर दोन्ही भावांनी दुसरे लग्न करून घेतल्यानंतर दोन्ही बहिणींनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला तक्रार केली असून पिंपळनेर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहे .
देश शिरवाडे येथील दोन्ही बहिणींचा विवाह धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आर्वी येथे सुनील व अनिल सोनवणे या दोन सख्ख्या भावांची 2016 ला झाला लग्नानंतर काही दिवसांनी दोघी बहिणींचा छळ सुरू झाला ते त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे दोन्ही बहिणी साक्री तालुक्यातील आपल्या माहेरी देश शिरवाडे निघून गेल्या माहेरी आल्यानंतर कोरोना काळात त्यांच्या सोनवणे परिवाराशी संबंध न आल्याने दोन्ही बहिणी गाफील राहिल्यामुळे त्याचा फायदा दोन्ही भावांनी घेऊन दुसरे लग्न करून घेतले अशी तक्रार पीडित महिलांनी केली आहे.
तक्रारीच्या अनुषंगाने अनिल संतोष सोनवणे सुनील संतोष सोनवणे कौशल्याबाई संतोष सोनवणे यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे याप्रकरणी पुढील तपास सोपोनी श्रीकृष्ण पारधी हे करत आहे

Post a Comment
0 Comments