बाळू जोशी,वाकडी. -:-: दि.०६/१२/०२४ आज रोजी आमच्या जि.प.केंद्रशाळा वाकडी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा देवकाबाई भोई, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री राजू चांदणे, श्री अतुल राऊत, शिक्षणप्रेमी श्री युवराज बिजागरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रल्हाद शिंदे सर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री राजूभाऊ चांदणे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून गावातील सामाजीक कार्यकर्ते श्री युवराज बिजागरे (पेंटर) यांनी उपस्थिती लावली.
सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक श्री ज्ञानेश्वर पाटील सर व श्री सूर्याजी काकडे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. समता, बंधुता व न्याय या मूल्यांची रुजवणूक करण्याचे काम राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले व सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची द्वारे खुले करून दिली याबद्दल माहिती देण्यात दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण सर्वांनी मार्गक्रमण केले पाहिजे असे प्रतिपादन वक्त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री कैलास सोनवणे सर यांनी केले तर आभार श्री शेखर महाजन सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती सुनिता मोरे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.

.jpg)
Post a Comment
0 Comments