.
बाळू जोशी ,वाकडी.ता.जामनेर.दि.०४/१२/०२३
नव मतदारांची शंभर टक्के नोंदणी व्हावी या हेतूने शासनाच्या वतीने राजकुंवर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य मा. डॉ भगवानसिंग डोभाळ सर यांच्या सहकार्याने राजकुंवर महाविद्यालय धावडा या ठिकाणी नव मतदार नोंदणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भोकरदन तालुक्याचे उपविभागीय अधिकारी माननीय श्री दयानंद जगताप साहेब, तहसीलदार माननीय श्री संतोष बनकर साहेब, गटशिक्षणाधिकारी माननीय श्री दिलीप शहागडकर साहेब, गटसमन्वयक मा श्री शेणपड नेव्हार साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती तर वडोद तांगडा केंद्राचे केंद्रप्रमुख मा श्री शंकर बिऱ्हाडे साहेब, जळगाव सपकाळ केंद्राचे केंद्रप्रमुख मा श्री सपकाळ साहेब, वालसा वडाला केंद्राचे केंद्रप्रमुख मा श्री भगवान दळवी साहेब, पिंपळगाव रेणुकाई केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मनोज लोखंडे साहेब यांचीही उपस्थिती होती . तर धावडा बीड अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयाचे माननीय सर्व प्राचार्य, नोडल अधिकारी प्रभाग क्रमांक 1 ते 24 सर्व BLO उपस्थित होते, यावेळी उपस्थित महाविद्यालयालयीन नवमतदार विद्यार्थ्यांचे फॉर्म क्र-06 भरून घेण्यात आले, याप्रसंगी, मा श्री बनकर साहेब, मा श्री जगताप साहेब यांनी मतदार नोंदणी बद्दल सखोल मार्गदर्शन केले तर मा शहागडकर साहेब यांनी शाळा निहाय आढावा घेऊन कामाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा श्री विठ्ठल इंगळे सर यांनी केले, तर मान्यवरांचे आभार प्रदर्शन राजकुंवर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मा श्री जाधव सर यांनी मानले.


.jpg)
Post a Comment
0 Comments