Type Here to Get Search Results !

अयोध्येच्या ऊर्जे मुळे कृषी पंढरी भारावली;जरंडीला शोभायात्रा मुळे उत्साह संचारला-रात्री उशिरापर्यंत शोभायात्रा सुरू.


सोयगाव,(साईदास पवार) ता..२२...रामललाच्या जरंडी मधील सायंकाळच्या सहा वाजेच्या शोभायात्रेने अयोध्येच्या ऊर्जेमुळे कृषी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जरंडीला उत्साह संचारला होता सहा वाजता प्लॉट भागातून जिवंत देखावे, लेझीम पथक,वारकरी दिंडी आदींसह शोभा यात्रा गावातून निघाली दरम्यान गावात वीस किमी अंतराच्या रांगोळ्या तून प्रभू श्रीराम यांची शोभायात्रा निघाली होती 

    सोयगाव तालुक्यातील जरंडी गावात अयोध्येच्या राम प्राण प्रतिष्ठान चे आगळेवेगळे स्वागत करण्यात आले गावात घराघरवर गुढ्या व झेंडे उभारून रामलला चे स्वागत करण्यात आले दुपारी बालाजी मंदिरात रामनाम जप करण्यात आला दरम्यान गावातून सायंकाळी निघालेली प्रभू श्रीराम सीता व हनुमान यांच्या जिवंत देखाव्या सह शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत पूर्ण गाव सहभागी झाले रात्री उशिरापर्यंत ही शोभायात्रा सुरू होती त्यामुळे जरंडीला पहाटे सहा वाजेपासून सुरू असलेला उत्साह रात्री उशिरापर्यंत सुरूच होता शोभायात्रेत वारकरी, लेझीम पथक, तरुण तरुणाई थिरकली होती 

------गावंतर्गत रस्त्यावर तब्बल वीस किमी च्या अंतरावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या घरांवर झेंडे सायंकाळी दिवे लावण्यात आल्या मुळे सायंकाळी दिवाळी साजरी करण्यात आली होती.....

चौकट----वीस फुटांच्या रांगोळीतून साकारले प्रभू श्रीराम व अयोध्येतील मंदिर

गावात वीस फुटांच्या रांगोळीतून प्रभू श्रीराम व अयोध्येतील मंदिर साकारले होते रांगोळ्या आणि दिव्यांनी जरंडी गाव चकाकून गेल्या मुळे सोयगाव तालुक्यातील जरंडी ला मिनी अयोध्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.....

Post a Comment

0 Comments