सुनील लोहार-कुऱ्हाड
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 39 व्या अखंड हरिनाम सप्ताहा निमित्ताने नामांकित कीर्तनकारांची सात दिवस कीर्तने झाली. आज दिनांक सोमवार रोजी सकाळी रवींद्र महाराज तारखेडे कर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. यात दुग्ध शर्करा योग असा की आज 22 जानेवारी रोजी अखंड हिंदुत्वाचे दैवत प्रभू रामचंद्र अयोध्येत विराजमान झालेत ,या अनुषंगाने सप्ताह कमिटी तर्फे आज महाप्रसाद म्हणून पुरणपोळी असा गोड जेवणाचा कार्यक्रम येथील माळी समाज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेला होता. काल्याच्या कीर्तनानंतर सर्व गावकऱ्यांनी पुरणपोळीचा आस्वाद घेतला.
त्यापूर्वी येथील राममंदिर परिसरात अयोध्या प्राणप्रति्स्थापना मुहूर्तावर भाजप शाखा कुऱ्हाड तर्फे दुपारी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते . भाजपा शाखा तर्फे अनेक दिवसापासून प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने कुऱ्हाड येथे तयारी सुरू होती.गावातील मुख्य चौकात ठिकठिकाणी भगवे ध्वज,घरासमोर सडा रांगोळी टाकण्यात आलेली होती काही ठिकाणी दिवे लावण्यात आले. हर घर श्रीराम असा नारा देत घरोघरी पेंटिंग करण्यात आली होती.आज राम मंदिरावर अनेक महिलांनी पूजाअर्चा करीत प्रभू रामच्या भजनावर पावली खेळत आनंद लुटला. सप्ताह कार्यक्रम व श्रीराम प्रतिष्ठापना कार्यक्रम यशस्वीते करिता मा. जिल्हा परिषद सदस्य संतोष चौधरी, भाजप गन प्रमुख जगदीश तेली, ग्रामपंचायत सदस्य अरुण बोरसे, सुधाकर महाजन, सरपंच डॉ.प्रदीप महाजन, उपसरपंच कौतिक पाटील, अशोक बोरसे,मनोज शिंपी, विलास चव्हाण, देवराम बोरसे, रामदास देशमुख ,विकास देशमुख तसेच गावातील भजनी मंडळ,तरुण कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.
.jpg)
.jpg)

Post a Comment
0 Comments