Type Here to Get Search Results !

रेशनिंगच्या पुरवठ्यासाठी पाचोर्यात कॉंग्रेस चे ढोल बजाओ आंदोलन आयोजन!! लोहारा येथेही जवळपास 7 दिवसांपासून सर्व्हर डाऊन मुळे धान्य वाटप बंद-ग्रामस्थांसह कर्मचाऱ्याची फजिती.



पाचोरा तालुक्यातील व शहरातील रेशन दुकानदारांचा गेल्या महिनाभरापासून धान्यसाठा पडून असून संबंधित दुकानदारांच्या शासनाने दिलेले सर्वेर बंद असल्यामुळे लाभार्थींना लाभ देता येत नाही त्यामुळे गोरगरिबांना धान्यां पासुन वंचित असून सत्ताधारी सह शासनाला  जागे करण्यासाठी या शिवाजी महाराज चौकात आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर ढोल बजाओ आंदोलन कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केले आहे. 


 रेशनिंगचा मालसाठा गेल्या महिन्याभरापासून  तालुक्यामध्ये सर्व दुकानदारांना वितरीत करण्यात आला आहे मात्र सर्वर डाऊन च्या नावाखाली गेल्या महिन्याभरापासून हे लाभार्थी पाचोरा तालुक्यातील व शहरातील सर्वच गोरगरीब जनता ही रेशनच्या धान्यां पासून वंचित झालेली आहे. सत्ताधारी आणि शासन झोपेचे सोंग घेत असून यांना जागे करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली दि 1 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर ढोल बजाव आंदोलन करून शासनाला जागे करण्याचे काम काँग्रेस करणार आहे. या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष अॅड अमजद पठाण यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments