Type Here to Get Search Results !

तेली समाजातील तीनशे विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न!! खान्देश तेली समाज मंडळाचा उपक्रम. तुम्ही संधी दिली तर संधीचे सोने करणार - सौ कल्पना महाले.


दिशा लाईव्ह न्यूज-:- -" तुम्ही मला संधी दिलीच तर संधीचे सोने करणार"  असे प्रतिपादन माजी महापौर सौ.कल्पना काकू महाले यांनी केले ते खान्देश तेली समाज मंडळाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरात आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शिरीषदादा चौधरी,भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी,चोपडा नपा.चे गटनेते जीवन चौधरी,माजी महापौर जयश्री अहिरराव,प्रतिभा चौधरी,नगरसेवक नरेश चौधरी,सुनील महाले,मंगलताई चौधरी,पुष्पाताई बोरसे,माजी शिक्षण सभापती संदीप तात्या महाले,शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले,शामकांत ईशी,राजेंद्र महाले,पंडित महाले,खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी,सचिव रवींद्र चौधरी,भगवान चौधरी,रामभाऊ चौधरी,सुमनताई महाले,सुभाष जाधव,नरेंद्र चौधरी,युवराज चौधरी,रामेश्वर चौधरी,बबन थोरात,महादू चौधरी,पोपट चौधरी,दीपिका चौधरी,अशोक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते ते पुढे म्हणाले की,मी धुळे शहर विधानसभेसाठी इच्छुक असून धुळे शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहील,त्यामुळे आपण सर्वांनी मला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. दीप प्रज्वलन करून,जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताने सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.गुणी जणांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल कैलास चौधरी व देवदूत बनून पोलीस अधिकारीचे प्राण वाचवणाऱ्या श्रीमती हर्षदा चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तदनंतर समाजातील विविध पदांवर निवड झालेले व विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले समाज बांधव तसेच गुणी विद्यार्थी अशा तीनशे गुणीजनांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी आमदार शिरीष दादा चौधरी,भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी,माजी महापौर जयश्री अहिरराव,प्रतिभा चौधरी,नरेश चौधरी,सुभाष जाधव,प्रकाश चौधरी यांनी मनोगत व्यक्त करून मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी व मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.रूपाली चौधरी, हरिष चौधरी या विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देताना सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मंडळाचे आभार मानले.प्रस्ताविकातून सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी मंडळाच्या सर्व उपक्रमांची माहिती देऊन समाजाकडून सहकार्याची अपेक्षा करून सर्वांचे आभार मानले. यावेळी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटप देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिवेणी सोनवणे व रूपाली चौधरी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री मनोज चिलंदे,राजेंद्र चौधरी,किशोर पुंडलिक चौधरी,चंद्रकांत चौधरी,गजेंद्र चौधरी,अमोल चौधरी, किशोर हरि चौधरी,भाऊसाहेब चौधरी,अतुल वाघ,भटू चौधरी,सुनील चौधरी,पंकज चौधरी,गजानन चौधरी,राकेश चौधरी,जयवंत चौधरी, दिपक चौधरी, मुकेश चौधरी,कमलेश चौधरी,दिनेश चौधरी,राकेश चौधरी,किशोर चौधरी,नंदुलाल चौधरी,प्रकाश चौधरी, महेश चौधरी,छोटू चौधरी,श्याम चौधरी,अरुण चौधरी,अजय चौधरी,सोपान चौधरी,अनिल बावस्कर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments