Type Here to Get Search Results !

शेंदूर्णी येथील गरुड विद्यालयात पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांची सदिच्छा भेट

 


दिशा लाईव्ह न्यूज-:- धि. शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटी संचलित,  आ.ग.र गरुड, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे विज्ञान विभाग सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव काकासो. सागर मलजी जैन मार्गदर्शक नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या समवेत संस्थेचे सहसचिव दादासो यु यु पाटील,युवा नेते भैय्यासाहेब स्नेहदीपजी गरुड,पत्रकार विलास अहिरे,शकुर शेख इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते.

याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे यांचा संस्थेकडून व  विद्यालय व कनिष्ठ, महाविद्यालयाकडून तेथोचित सत्कार करण्यात आला.या निमित्ताने विचारांचे आदान प्रदान करण्यात येऊन छोट्याखाणी कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य आर.एस.चौधरी सर यांनी केले.

 तदनंतर कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व सभागृहाला संबोधित करीत आश्वासीत करून आपण आपल्या संस्थे संदर्भात किंवा  विद्यालयासंदर्भात कोणत्याही प्रकारची समस्या,शिक्षकांचे प्रश्न 20 30 40 टप्पा, जुनी पेन्शन योजना अशा एक ना अनेक शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करीत असल्याचं त्यांनी व्यक्त केले.

 तसेच आपण कुठल्याही प्रकारची मदत मागा मी तुम्हाला शब्द देतो की, मी केव्हाही आपणासाठी उपलब्ध राहील व पाहिजे ती, मदत करण्यास बांधील राहील असे आपल्या मनोगतातून व्यक्त करून सभागृहात आनंदमय वातावरण निर्माण केले. 

कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय मनोगतात सागरमलकाका यांनी आपली विचारधारा मांडली, यानिमित्ताने सूत्रसंचलन विद्यालयाचे शिक्षक पी.जी पाटील यांनी केले.या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले मान्यवर गणेश सूर्यवंशी, किरण राजमल पाटील,त्याचबरोबर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही.डी. पाटील,पर्यवेक्षक  विजय शिरपुरे,,पर्यवेक्षक विनोद पाटील,महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिका,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती दिली.

Post a Comment

1 Comments
  1. सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!!

    ReplyDelete
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.