Type Here to Get Search Results !

आठ दिवसापूर्वी घरातून निघून गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळला


कुऱ्हाड प्रतिनिधी----सुनील लोहार.

कुऱ्हाड ता.पाचोरा_सुमारे आठ ते दहा दिवसापासून बेपत्ता असलेल्या कुऱ्हाड बुद्रुक येथील वृध्द महिलेचा मृतदेह बुधवारी सायंकाळी  कुजलेल्या स्थितीत मिळून आला.

येथील रहिवासी केसरबाई रघुनाथ दांडगे वय 70 ही महिला सुमारे आठ ते दहा दिवसापासून घरी न सांगता निघून गेल्या होत्या .नातेवाईक तपास करीत असताना बुधवारी सायंकाळी सहा वाजता  या वृद्ध महिलेचा मृतदेह येथून जवळ असलेल्या लाख तांडा जंगलात तलावाशेजारी  गुराख्यांना आढळून आला.



घटनेची माहिती मिळताच लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शुभम तेली यांनी शवाचे जागेवर विच्छेदन केले. 

घटनास्थळी   नांद्रा वनविभागाचे वनरक्षक  प्रकाश देवरे ,पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे ,हवालदार अरविंद मोरे ,राहुल बेहरे ,अमोल पाटील व अतुल पवार यांनी भेट देऊन जागेवर घटनास्थळाचा पंचनामा केला.वनमजूर चंद्रकांत कोळी यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


Post a Comment

0 Comments