Type Here to Get Search Results !

लोहारा, कळमसरा येथे तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या चतु:शताब्दी (400 व्या) जयंती महोत्सवानिमित्त उत्साहात साजरा.. सर्व समाज बांधवांची व भगिनींची लक्षणीय उपस्थिती!!

 


दिशा लाईव्ह न्यूज -:-  लोहारा व कळमसर ता.पाचोरा येथे आज दि.8 रोजी तेली समाजाचे आराध्यदैवत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रथम संताजीच्या प्रतिमेचे पूजन लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते  विजय लोटु चौधरी यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली.

तसेच जगनाडे महाराज मंगल कार्यालयात तेली समाजाचे अध्यक्ष प्रल्हाद रामदास चौधरी, व सचिव विजय दशरथ चौधरी यांच्या हस्ते ही  संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


यावेळो गावातून सव्वाद मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत संताजींच्या जयघोषाने लोहारा नगरी   दुमदुमली होती.


कळमसरा येथे ही आज संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्व समज बांधव उपस्थित होते.



लोहारा येथे मिरवणूक येथील संताजी जगनाडे चौकात  विसर्जित करण्यात आली. यावेळी गुणवंताचा सत्कार करण्यात आला.


समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिगंबर नथ्थु चौधरी, प्रभाकर काळू चौधरी, अमृत भगवान चौधरी यांनी महाराजांच्या जीवनावरील काही प्रसंग समाज बांधवांना सांगितले.

प्रास्ताविक दीपक पवार यांनी केले. समाजात एकजूट महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर उपस्थितांचे आभार दौलत चौधरी यांनी मानले.

यावेळी संताजी युवा मंचच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments