दिशा लाईव्ह न्युज -:- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव जि. जळगाव आयोजित स्व. आबासाहेब मधुकर सदाशिव जकातदार (वकील) व स्व. वत्सलाबाई मधुकर जकातदार स्मृती करंडक विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 2024-25 चे प्रथम सांघिक पारितोषिक . शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा जि. जळगाव येथील कु. गायत्री श्रीकृष्ण क्षीरसागर व कु. चेतना रणदीप हिरे या विद्यार्थिनींना मिळाले.
त्याबद्दल त्यांचा सत्कार व अभिनंदन माजी आमदार व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भाऊसाहेब दिलीपजी ओंकार वाघ, चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजयजी ओंकार वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी श्री. गो. से. हायस्कूल स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन मा. श्री. दादासाहेब खलीलजी देशमुख, ज्येष्ठ संचालक व स्पर्धा प्रायोजक मा. श्री. बाबासाहेब विनय मधुकर जकातदार, ज्येष्ठ संचालक मा. श्री. अण्णासाहेब वासुदेव भिवसन महाजन, प्राचार्य मा. डॉ. शिरीष बी. पाटील, उपप्राचार्य मा. डॉ. जे. व्ही. पाटील, IQAC समन्वयक डॉ. शरद बी. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. बी. तडवी, करिअर कट्टा विभाग समन्वयक डॉ. माणिक पाटील, वादविवाद स्पर्धा समन्वयक प्रा. स्वप्नील भोसले व महाविद्यालयाचे प्राध्यापक-प्राध्यापिका उपस्थित होते.
**********************************************
Post a Comment
0 Comments