दिशा लाईव्ह न्यूज--::-- भारत पाटील (म्हसास -प्रतिनिधी) लोहारा येथून जवळच असलेल्या रामेश्वर येथे काल दिनांक 29/01/ 2025 वार बुधवार रात्री 11:30 ते 12 वाजेच्या दरम्यान रामेश्वर शिवारात गट नंबर 64/ब/1 सुधाकर भास्कर पाटील, रा. म्हसास यांच्या शेतात दोन गायी व इतर जनावर बांधलेले असतात .
तरी सदर गायीवर बिबट्याने हल्ला करून एक गाभण गाय व तिच्याच जोडीच्या गायीवर जीवघेणा हल्ला करून गायी मृत्युमुखी पडल्या असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पशुधनाचे आर्थिक नुकसान झाले आहे,
सदर गायीचा पंचनामा वनपाल देवरे यांनी केला व शेवविच्छेदन पशुवैद्यकीय कर्मचारी प्रताप घुले यांनी केले.
सध्या रब्बी हंगाम असून शेतात दादर,,ज्वारी ,मका व इतर पिके आहे. तरी शेतकऱ्यांना रात्री शेतात पिकांना पाणी घालण्यासाठी जावे लागत असून कुठल्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये म्हणून सदर बिबट्याचा वन विभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे,
Post a Comment
0 Comments