Type Here to Get Search Results !

"करियर कट्टा " अंतर्गत गरुड महाविद्यालयाला जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार.....


दिशा लाईव्ह न्यूज ---(प्रा.योगिता चौधरी, )   -:-  शेंदुर्णी येथील अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी या महाविद्यालयाला महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असणाऱ्या    "करिअर कट्टा " या उपक्रमांतर्गत   उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून प्राध्यापिका डॉ. योगिता पांडुरंग चौधरी यांना राज्यस्तरीय पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार तर जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून गरुड  महाविद्यालयाला द्वितीय पुरस्कार प्राप्त झालेला  आहे. 


2023 -24 या शैक्षणिक वर्षांमध्ये महाविद्यालयाने "करिअर कट्टा "या उपक्रमात घेतलेला  सहभाग, आयोजित  कार्यक्रम, जिल्हा समन्वयक म्हणून डॉक्टर योगिता चौधरी यांनी केलेली कामगिरी, दिल्ली येथील प्रशासकीय अधिकारी यांच्या घेतलेल्या प्रत्यक्ष मुलाखती, एकंदरीत प्राप्त यश या कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराबद्दल करिअर कट्ट्याची टीम, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त  प्रा. डॉ .योगिता पांडुरंग चौधरी यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन मा. दादासाहेब संजयरावजी गरुड, व्हाईस चेअरमन मा. भी.शा. शेळके,  सचिव मा. काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव मा. दादासाहेब यु. यु.पाटील , संस्थेचे कार्यालयीन सचिव मा.भाऊसाहेब दीपकजी काशिनाथराव गरुड , महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय वामनराव भोळे , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी तसेच सर्व संस्था परिवार यांनी महाविद्यालयाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

 सदर पुरस्काराचे वितरण मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात केले जाईल.


 .

Post a Comment

0 Comments