Type Here to Get Search Results !

व्यापाऱ्याच्या रस्त्यावरील मक्क्याने दिला २ जणांच्या जीवालाच धक्का ! पहूर जवळ विविध ४ अपघातात चौघांचा मृत्यू. शेंदूरणी येथील चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर!! तरुण मयत मयूर वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.

मयत--मयूर चौधरी, शेंदूरणी.




              मयत-- शंकर चौधरी,धुळे.


शंकर भामेरे ,पहूर , ता .  जामनेर ( ता . १२)

पहूर परिसरासाठी गुरुवार अपघात वार ठरला असून विविध चार ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून  यातील चार जखमींची प्रकृती चिंताजनक आहे .जखमींवर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . 



         शिवना येथून भुसावळकडे  बाजाराचा माल घेऊन जाणाऱ्या ४०७ मालवाहू टेम्पोची  सोनाळा शिवारात मध्यरात्री साडेअकराच्या   सुमारास  ( क्र . एम . एच . २० डी . ई . ४३ १३ ) समोरून पहूरकडे येणाऱ्या दुचाकीला  ( क्र . एम . एच . १९ बी . आर . २ १ २६ )  रस्त्यावर वाळत टाकलेल्या मक्क्यावर घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मयूर गणेश चौधरी ( वय २५ ) रा . शेंदूर्णी व शंकर भगवान चौधरी ( वय - ३५ ) रा . धुळे हे दोघे जागीच ठार झाले .दुचाकी वरील मयूर देवेंद्र गोढरी हे जखमी झाले . तसेच  टेम्पो चालक शेख सलिम शेख याकूब ( रा . शिवना , ता . सिल्लोड )  यांची ही प्रकृती चिंताजनक असून या अपघातातील दोघांना रुग्णवाहिका चालक  अमजद खान , डॉ . लियाकत अब्बासि यांनी तात्काळ पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . 




पुढील उपचारार्थ त्यांना जळगाव येथे जिल्हा रुग्णालयातउपचारार्थ हलविण्यात आले आहे . याप्रकरणी  रघुनाथ  चौधरी  रा . शेंदूर्णी  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे . 

     तसेच अजिंठा येथून दुरुस्ती साठी जळगाव येथे गेलेली टाटा ४०७ ( क्र . एम . एच . ०४ डी . के . ३१९३ )  दुरुस्त होऊन पहूरकडे येत असताना आज मध्यरात्री  पाळधी नजिक  नादुरुस्त झाली .  वाहन चालक कलीम शेख मोहम्मद हे वाहन नादुरुस्त झाल्याने खाली उतरले .त्यांचा मुलगा शेख तौसिफ  व कारागीर हाकिम  शेख सरदार  हेहि खाली उतरून गाडीतील बिघाड पाहत असतानाच   जळगाव कडून भरधाव  वेगात येणाऱ्या आयशरने ( क्र . एम . एच . १८ ए ए ७६ ० ७ )   मागून दिलेल्या जबर धडकेत  टेम्पो चालक कलीम शेख रस्त्यावर फेकल्या गेले . त्यांना तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात  दाखल केले .  डॉ. मयुरी पवार यांनी तपासणी अंती त्यांना मयत घोषित केले . याप्रकरणी आयशर चालकाविरुद्ध  पहूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .



जामनेर रस्त्यावर मध्यरात्री झालेल्या अपघातस्थळापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर  दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्कार्पिओ ( एम . एच . ३९ डी . २५ ४५ ) आणि यामाहा (  एम . एच . १६ डी . जे . ३० ९ ९ ) यांच्यात समारोसमोर  झालेल्या धडकेत दुचाकी स्वार राहुल नागो तेली व  शिवा शंकर सरताळे रा . वाकी  हे दोघे गंभीर जखमे झाले असून त्यांना जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे . 

    तसेच ट्रॅक्टर अपघातात सलाउद्दीन शेख जैनुद्दीन ( वय - ३ २ ) रा . शेंदुर्णी   हेही जागीच ठार झाले असून याप्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे .


           बाजाराच्या भाजीपाल्याची रस्त्यावर माती -

बाजारासाठी नेला जात असलेला भाजीपाला रस्त्यावर इतरत्र पसरला गेला . अपघात स्थळी रक्ताचे थारोळे साचले होते .मात्र..... मार्केटला जाणारी फुलं मयतांवरच उधळल्या गेली होती . घटनास्थळचे हृदय द्रावक मन हेलावून टाकणारे होते .

चौकट - ---

           कसा झाला अपघात ?

पहूर -जामनेर मार्गावर (  ट्रक ले बाय ) वाहनांना थांबविण्यासाठी असणाऱ्या जागेवर पहूर येथील भुसार व्यापारी पंकज प्रकाशचंद लोढा यांनी कब्जा करून अनधिकृतरित्या ' मार्केट ' थाटले होते . गेल्या अनेक दिवसांपासून हा व्यापार बिनदिक्कीतपणे सुरू होता . राज्य मार्गावरच सार्वजनिक ठिकाणी थाटलेल्या या अनधिकृत भुसार ' मार्केट 'वरून शेकडो पोते मक्का दररोज वाळवला जात होता . मका वाळवणे , पोते भरून त्यांची ट्रकद्वारे विक्री करणे  जणू काही असाच  'उद्योग 'भर रस्त्यात सुरू होता . रात्रीच्या वेळेला याच मक्यावर वाहने आली आणि त्यांना नियंत्रण करणे अवघड झाल्याने भीषण अपघात घडून दोघांचा जागीच बळी गेला .या अपघातास जबाबदार कोण ?

निरपराध बळींचा दोष  होता काय ? सार्वजनिक बांधकाम विभागाची या 'उद्योगा ' स मूकसंमती होती का ?   पोलीस प्रशासनाचा वरदहस्त होता की कोणती राजकीय शक्ती ? असे विविध प्रश्न सामान्य जनतेतून विचारले जात आहेत . 


 रातोरात झाला शेकडो क्विंटल मका गायब !


मध्यरात्री अपघात घडताच संबंधित व्यापाऱ्याने  रातोरात शेकडो क्विंटल मक्का भरून पोबारा केला . मका उचलण्यासाठी मात्र दोन जीवांना बळी जावे लागले दुर्दैवच म्हणावे लागेल . याप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते , गणेश सुस्ते   पुढील तपास करीत आहेत .



दिशा लाईव्ह न्यूज.

संपादक -:- दिनेश चौधरी, लोहारा.(मेणगावकर )
9309918930
9881028027
-----------------------------------------------;;--------------------------
https://youtu.be/BOyvfeG-8as?si=Ml4wao-CPwwuLqDj
वरील व्हिडीओ बघण्यासाठी वरील लिंकला क्लीक करालिंकवर प्रेस करा..आणि ओपन करा....

*पहूर-जामनेर रोडवर दि.10 रोजी शेंदूरणी येथील  येथील मयूर गणेश चौधरी, व धुळे येथील शंकर भगवान चौधरी या शालक-पाहुण्यांचा अपघात झाला ती जागा..*

*आज कोण्या एकाच्या दुर्लक्षित पणामुळे  एक कुटुंबाचा कर्ता मुलगा ,तर मुलीचं सौभाग्य गेलं!!*
*काय अवस्था असेल त्या पित्याची!! काय वाटत असेल त्या मुलीला?*

*वरील बातमी वाचण्यासाठी ब्लू लिंकला क्लीक करा*

*सत्य तेच---फक्त दिशा लाईव्ह न्यूज!!*

✍️....दिशा लाईव्ह न्यूज  ...✍️
*****************************
*लोहारा परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी आपलं विश्वासनिय लोकप्रिय चॅनेल!!*
:::::::::::::::::::::::::::::::::: ::::::::::::: : :::
*मुख्य संपादक -:- दिनेश चौधरी, लोहारा.*
*(मेणगावकर )*

*जिल्हाध्यक्ष -:- द युवा ग्रामीण पत्रकार संघ,जळगांव*


*बातम्यांसाठी संपर्क साधा -:- दिनेश चौधरी, लोहारा*

     *9309918930*
      *9881028027*

Post a Comment

0 Comments