कुऱ्हाड प्रतिनिधी -:- सुनील लोहार.
दिशा लाईव्ह न्यूज ---:::----- पाचोरा भडगाव महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या मदतीने काल दि.11 च्या रात्री गिरड व परधाडे येथे एकूण आठ अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.
पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव तहसीलदार तसेच अवैध वाळू पथक प्रमुख शीतल सोलाट यांनी त्यांच्या पथकासह गिरड येथून अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर जमा करून गिरड चे पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पथकातील श्री हलकरे अप्पा,कुंभारे अप्पा ,वारे अप्पा महादू कोळी व लोकेश वाघ यांनी केली.
तसेच परधाडे येथून अवैध गौण खनिज वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले .
या पथकात भरत ननवरे मंडळ अधिकारी कुऱ्हाड भाग, नकुल काळकर ग्राम महसूल अधिकारी कुऱ्हाड खु,प्रवीण पवार ग्राम महसूल अधिकारी कुऱ्हाड बु , नरेंद्र पाटील ग्राम महसूल अधिकारी म्हसास, निखिल बळी नवनियुक्त ग्राम महसूल अधिकारी या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. सदर एकत्रित कारवाई ही भडगाव पाचोरा महसूल अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी काल रात्रीच्या वेळेस केली.
वरील करण्यात आलेल्या कारवाई मुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये धडकी भरली असून महसूल विभागाने कारवाईत सातत्य ठेवावे जेणेकरून नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होणार नाही.
Post a Comment
0 Comments