कुऱ्हाड प्रतिनिधी -:- -- सुनील लोहार
कुऱ्हाड ता पाचोरा_ पाचोरा येथून सुटणारी पाचोरा कुऱ्हाड मार्गे पहूर ही बस दररोज सायंकाळी उशिरा येत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
कुऱ्हाड, सांगवी, साजगाव, म्हसास व लोहारा परिसरातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पाचोरा येथे दररोज ये जा करीत असतात. तसेच या परिसरातील खेड्यापाड्यातील प्रवासी महिला,पुरुष सुद्धा कामानिमित्त पाचोरा येथे ये जा करीत असतात.
परंतु या सर्वांना पाचोरा येथून सायंकाळी साडे पाच वाजेची पाचोरा पहूर बस असते,परंतु ही बस वेळेवर लागत नसल्याने प्रवाशांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागते,आणि सद्या हिवाळ्याचे दिवस असून दिवस लवकर समाप्त होत असल्याने रात्र लवकर होते.
यामुळे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना, विशेषत मुलींच्या पालकांचे लक्ष मुलींकडे लागून असते की बस अजून आली नाही का? असा विचार पालकांच्या मनात येत असतो.
म्हणून पाचोरा आगारातून सुटणारी ही बस वेळेवर सोडण्याची मागणी या परिसरातील ग्रामस्थ,प्रवासी व विद्यार्थ्यांनी केली आहे.
अन्यथा विद्यार्थी आंदोलन करणार.
पाचोरा पहूर ही कुऱ्हाड मार्गे येणारी बस दररोज एक ते दीड तास उशिरा लागत असल्याने शालेय विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागते,घरी येण्यास उशीर झाला की पालक वर्ग रागवतात .
म्हणून ही बस उद्यापासून नियमित वेळेवर न झाल्यास सर्व ये जा करणारे विद्यार्थी लवकर पाचोरा आगारात या संदर्भात आंदोलन करणार म्हणून येथील आगर प्रमुख यांनी या समस्येकडे लक्ष घालून विद्यार्थी व प्रवसांची ही समस्या कायमची सोडविण्याची मागणी केली आहे.
Post a Comment
0 Comments