दिशा लाईव्ह न्यूज---शंकर भामेरे, पहूर , ता . जामनेर ( ता . ३० )
छत्रपती संभाजीनगरहून दुचाकीद्वारे पहूरकडे येत असताना दुचाकीच्या मागील चाकात साडी अडकल्याने झालेल्या अपघातात पहुर येथील ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज गुरुवारी ( ता . ३० )दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली .
मनीषा कैलास चौधरी ( वय ४८ ) या त्यांचा मुलगा ऋषीकेश कैलास चौधरी याच्या सोबत छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते . तेथून परतत असताना छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ वर निल्लोड फाट्या जवळील भवन गावाजवळ दुचाकीच्या ( एम . एच . १९ इ . सी . ३९ ७९ ) चाकात त्यांच्या साडीचा पदर अडकल्याने त्या खाली कोसळल्या . या अपघातात त्यांच्या डोक्याला व पाठीला जबर मार लागल्याने त्यांना तात्काळ सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले . वैद्यकीय अधिकारी डॉ . अर्चना सपकाळ यांनी तपासणी अंति त्यांना मयत घोषित केले . सिल्लोड येथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे .
मुलासमोरच आईने सोडले प्राण :मुलाचा आक्रोश -
दुचाकीच्या मागील चाकात साडी अडकून आई खाली कोसळल्याचे पाहताच ऋषीकेश भांबावून गेला . काय घडले आहे ? हे कळायच्या आतच मुलाच्या डोळ्यासमोर आईने प्राण सोडले .
मनीषा चौधरी या पहूर येथे जळगाव मार्गावर राहत होत्या . मनमिळाऊ स्वभाव आणि सहकार्याची भावना असणाऱ्या मनीषा चौधरी यांच्या पश्चात पती कैलास तुळशीराम चौधरी , २ मुले , सून , नातू असा परिवार आहे . त्या सचिन बावस्कर यांच्या भगीनी होत .त्यांच्या निधनाने पहुर परिसरावर शोककळा पसरली आहे .
महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण -
जळगाव -छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक ठिकाणी थंडावस्थेत आहे .
रस्त्याच्या दुर्दशेमुळे देखील अनेक ठिकाणी अपघात घडत असून अपूर्ण काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी नागरिक करत आहेत .
Post a Comment
0 Comments