Type Here to Get Search Results !

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोबाईलचा जपून वापर करा : डीवायएसपी धनंजय येरूळे पहूर येथे सावित्रीबाई फुले विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा सोहळा ! विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या शाळा अन् शिक्षकांप्रती कृतज्ञ भावना



 दिशा लाईव्ह न्यूज-:-शंकर भामेरे, पहूर ,ता . जामनेर ( ता . ३१ ) वाढत्या सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांसह सर्वांनीच मोबाईलचा जपून वापर करावा , कोणत्याही प्रकारच्या अनोळखी लिंक  उघडू नका , असे प्रतिपादन पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांनी केले . महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित शुभेच्छा समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते .


प्रारंभी विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले . महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे अध्यक्षस्थानी होते . मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे यांनी प्रास्ताविक केले .यावेळी सरस्वती देवी , महात्मा फुले ,  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले .


पोलीस निरीक्षक सचिन सानप ,केंद्रप्रमुख भानुदास तायडे , सचिव भगवान घोंगडे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही . जी .भालेराव , आर . टी . लेले कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक  मधुकर आगारे  आदी मान्यवरांनी मार्गदर्शन  केले . हर्षली जाधव , गौरव गव्हाळे , प्रांजली धनगर , प्रतीक्षा गोंधनखेडे या विद्यार्थ्यांनी शाळा आणि शिक्षकांप्रती कृतज्ञ भाव व्यक्त केले . वर्गशिक्षिका कल्पना बनकर , क्रीडा शिक्षक हरिभाऊ राऊत यांनी शुभेच्छापर  मनोगत व्यक्त केले . उपस्थित मान्यवरांचा स्नेहवस्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी  मुख्याध्यापक सुधीर महाजन ,  अजय देशमुख , अमोल क्षीरसागर ,  सुदर्शन सोनवणे  आदी मान्यवर उपस्थित होते . 

                           यांचा झाला सत्कार!!

आर . टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही .जी .भालेराव यांना नुकताच नागपूर येथे १९ व्या अखिल भारतीय प्रतिभा संमेलनात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार मिळाल्या प्रीत्यर्थ त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला . उपशिक्षक अमोल श्रावण बावस्कर यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएचडी पदवी बहाल करण्यात आल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला .



शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रौप्य पदकांची कमाई केल्याबद्दल १० वीची विद्यार्थिनी प्रांजली शरद धनगर व माहेश्वरी संजय धनगर ( ९ वी ) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . 


सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांनी  पाहूण्यांचा परिचय सांगीतला . माधुरी बारी यांनी सुत्रसंचालन केले तर डॉ . अमोल बावस्कर यांनी आभार मानले . समारोपीय सत्रात बी . एन . जाधव यांनी वंदे मातरम सादर केले .यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले . यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .



Post a Comment

0 Comments