Type Here to Get Search Results !

कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोहारा विद्यालयात अंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा संपन्न!!


दिशा लाईव्ह न्यूज   --::--  धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ . जे. जी .पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा दि.20 डिसेंम्बर रोजी शिक्षण महर्षी  कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त लोहारा येथे अंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा संपन्न झाल्या .


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शामराव शेळके होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्वासराव पाटील ,स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य उत्तमराव शेळके ,डॉ .देवेंद्र शेळके, सामाजिक कार्यकर्ते शिवराम  भडके साहेब उपस्थित होते .


सुरुवातीला विद्यालयातील विद्यार्थिनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते  सरस्वती माता, सत्तगुरू हरिप्रसाद महाराज, संत गाडगे महाराज ,स्वर्गीय अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड ,कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या प्रतिमा चे पूजन करून  दीप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष  आणि उपस्थित मान्यवर यांचे विद्यालयाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. यु. डी. शेळके मॅडम यांनी केले .त्यांनी या स्पर्धेविषयीची रूपरेषा व कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या शैक्षणिक कार्याविषयीची माहिती दिली .


कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयात इयत्ता पाचवी ते सातवी ,आठवी, ते दहावी अशा दोन गटात वकृत्व स्पर्धा घेण्यात आलेली होती. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मोठ्या गटात  विद्यालयाचे पर्यवेक्षक  पी.एम. सुर्वे यांचे चि.प्रथमेश पुरुषोत्तम सुर्वे, द्वितीय क्रमांक साक्षी नरेंद्र पालीवाल ,तर उत्तेजनार्थ बक्षीस प्रज्ञा नाना माने यांनी पटकावला.

तर लहान गटात प्रथम क्रमांक स्वामिनी दीपक कासार, द्वितीय क्रमांक सृष्टी शिवाजी क्षीरसागर तर उत्तेजनार्थ बक्षीस ऋतुजा मनोज सरोदे यांनी पटकवला.

यावेळी विजेत्यांना  विद्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र, ट्रॉफी व गुलाब पुष्प देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.

कै शिवलालभाऊ राजपूत यांच्या स्मरणार्थ डॉ .जे. जी. पंडीत विद्यालयाचे माजी  कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री आर एस परदेशी सर यांनी बँकेत ठेवलेल्या कायमस्वरूपी ठेवीतून दरवर्षी  वाद विवाद स्पर्धेतील पात्र विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली जातात.

 आतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी भारत पाटील, द्वितीय क्रमांक चेतना हिरे, तर उत्तेजनार्थ बक्षीस सुजाता अर्जुन देशमुख व वैष्णवी भगवान सुशीर यांनी मिळवला.

 प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थिनीला ट्रॉफी प्रमाणपत्र व रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देण्यात आले. द्वितीय बक्षीस प्रमाणपत्र रोख रकमेच्या स्वरूपात देण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षीस सुद्धा प्रमाणपत्र रोख रक्कम स्वरूपात देण्यात आले.

 या वादविवाद स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर अतुल सूर्यवंशी सर, भूषण पाटील सर व सेवानिवृत्त मुख्याध्यापक माने सर होते.


या कार्यक्रमाचे आयोजक सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर एस परदेशी सर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गावातील  श्रीराम कलाल सर, शरद देशमुख सर, राजेंद्र भाऊ सुर्वे, ,प्रभाकर  चौधरी,  म्हसास येथील प्रकाश पाटील, भारत पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.

 या  प्रमुख पाहुण्यांमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर एस  परदेशी सर, माने सर, अतुल सूर्यवंशी सर, भूषण पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 विद्यालयातील कलाशिक्षक पी ए सोनार सर यांनी कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांचे पोट्रेट रांगोळीच्या स्वरूपात चित्र तयार केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब भीमराव शेळके यांनी आपल्या मनोगतातून कै.  बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला.

 कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. एस. व्ही. शिंदे सर, आणि आदर्श व्यक्तिमत्त्व असणारे विद्यालयाचे पर्यवेक्षक  श्री.पी. एम. सुर्वे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील सर यांनी केले .तर आभार वाय पी वानखेडे सर यांनी मानले.

 या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------


दिशा लाईव्ह न्यूज...अगदी योग्य दिशेने....

सत्य,स्पस्ट,आणि निर्भिड बातम्या फक्त--दिशा लाईव्ह न्यूज मध्येच.

संपर्क -:- दिनेश चौधरी, लोहारा.

9309918930



Post a Comment

0 Comments