Type Here to Get Search Results !

वीज ग्राहकांनी समस्यांचा वाचला पाढा. महावितरणचे अधिकारी सोडवित नाही तिढा!!कुऱ्हाड येथे महाविरणचा समस्यांचा पाढा.

                       कुऱ्हाड प्रतिनिधी -:-सुनील लोहार .

 दिशा लाईव्ह न्यूज -:-  कुऱ्हाड परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेच्या समस्येने ग्रामस्थ हैराण झाले असून,या बाबी कडे महावितरण वीज कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.गावाच्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून कुऱ्हाड खुर्द,बुद्रुक व कुऱ्हाड तांडा परिसरात आहे त्या ट्रान्सफॉर्मर वर लोड येऊन सकाळच्या वेळेस विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.




     कर्मचारी मुख्यालयी न राहता फोन उचलत नसल्याच्या तक्रारी.

शेतशिवरात किंवा गावात विद्युत पुरवठा कोणत्याही कारणाने खंडित झाला की सबंधित विद्युत ग्राहक विद्युत कर्मचाऱ्यांना फोन करतात यात एक दोन कर्मचारी सोडले असता बाकीचे कर्मचारी फोन स्वीकारण्यास इच्छुक नसतात,यामुळे  वीज ग्राहक हैराण होतात.तसेच येथील सबस्टेशन ला तक्रार घेऊन गेले असता एक ही कर्मचारी मुख्यालयी राहत नाही यामुळे रात्री बेरात्री विजेची समस्या निर्माण झाल्यास ग्रामस्थांना अंधारात राहावे लागते.

                 गावात आकोड्यांचे प्रमाण वाढले.

एखाद्या ट्रान्सफॉर्मर लोड येऊन ट्रान्सफॉर्मर बिघाड होण्याचे प्रमाण वाढले.याचे मुख्य कारण म्हणजे अधिकृत कनेक्शन पेक्षा अनधिकृत आकोडे धारकांची संख्या वाढलेली आहे यामुळे वारंवार बिघाड होत असतो.यामुळे जे नियमित  विद्युत ग्राहक असतात त्यांना खंडित विजेचा फटका बसतो. यामुळे महावितरण कंपनीकडून आकोडे धरकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

             नवीन ट्रान्सफॉर्मर चौकट ठरतेय शोभेची वस्तू!

लोहारा रस्त्या लगत नव्याने विजेच्या खांबांचे स्ट्रक्चर उभारण्यात आलेले असून या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून नवीन ट्रान्सफॉर्मर दाखल झालेला नाही यामुळे गावात पाचोरा रस्त्यावरील जुन्या डीपी वर भार येत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.  कुऱ्हाड विद्युत वितरण कंपनीचे प्रभारी अधिकारी या बाबी कडे दुर्लक्ष करीत आहेत.

वरील समस्या बघता कुऱ्हाड 33 के व्ही सब स्टेशनला कायमस्वरूपी  नियुक्त असलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



Post a Comment

0 Comments