दिशा लाईव्ह न्यूज -:- दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को -ऑफ सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता. जामनेर आयोजित कै.आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुण्यस्मणार्थ राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये श्रीमती पी डी बडोला माध्यमिक विद्यालय वरखेडी ता. पाचोरा येथील कु.नयना हिरे इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले .त्यात रोख रक्कम ,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र शेंदुर्णी संस्थेचे सहसचिव माननीय दादासाहेब श्री यु यु पाटील सर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
या कर्यक्रमास शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय दादासो श्री संजयरावजी गरुड, तसेच संस्थेचे सचिव काकासो श्री सागरमलजी जैन तसेच दादासो श्री किशोर पाटील उपस्थित होते.
सदर विद्यार्थिनींला विद्यालयातील मुख्याध्यापक श्री पी आर गरुड सर ,पर्यवेक्षक श्री जे एस जुबंळे सर तसेच विषय शिक्षक श्री एस डी चौधरी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनीचे कौतुक केले.
Post a Comment
0 Comments