दिशा लाईव्ह न्यूज -:- तेली समाजाचे संतशिरोमणी संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंतीच्या निमित्ताने खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने मागील वर्षापासून चतु:शतशताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत होता. वर्षभरामध्ये दरमहा एक यशस्वी कार्यक्रम घेऊन हा महोत्सव साजरा करण्यात आला.यामध्ये विद्यार्थी गुणगौरव,वधु-वर परिचय मेळावा तसेच विविध कार्यक्रम घेऊन हा महोत्सव साजरा करण्यात आला.या चतु:शतशताब्दी महोत्सवाचा सांगता समारंभ ४०० व्या जयंतीच्या निमित्ताने रविवार दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.
धुळे शहरातील राजवडे बँकेजवळ असलेल्या गुरु-शिष्य स्मारकामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून मंडळाच्या सर्व पदाधिकारींच्या हस्ते सकाळी नऊ वाजता गुरु- शिष्य स्मारक येथे संताजी महाराजांना अभिवादन करण्यात येईल.दुपारी तीन वाजता ध्वजारोहण होऊन,चार वाजता २१ जोडप्यांच्या हस्ते महापूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता धुळे जिल्ह्यातील नवनिर्वाचित सर्व आमदारांचा सत्कार समारंभ तसेच खान्देश किंग आबा चौधरी व धीरज चौधरी यांचा भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन रात्री दहा वाजेपर्यंत करण्यात आलेले असून यावेळी उपस्थित सर्व भाविक बंधू भगिनींना महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.संताजी महाराज यांच्या ४०० व्या जयंतीच्या निमित्ताने समाजातील ४०० समाजसेवक बंधू-भगिनींचा यावेळी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येईल असे देखील मंडळाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.
दिवसभराच्या आयोजित या चतु शतशताब्दी महोत्सवाच्या सांगता समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक संदीप तात्या महाले,गुरु-शिष्य स्मारक समितीचे अध्यक्ष गुड्डूभाऊ अहिरराव, माजी नगरसेवक सुनील काका महाले, काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज आबा करणकाळ,नरेश आप्पा चौधरी,माजी महापौर सौ.कल्पना काकू महाले,सौ. जयश्रीताई अहिरराव,सौ. प्रतिभाताई चौधरी,भाऊसाहेब देविदास चौधरी,सामाजिक कार्यकर्ते आनंद बाबूलाल चौधरी, शशिकांत बळीराम चौधरी, भटूबापू संतोष चौधरी,अनिलनाना अहिरराव यांच्या सह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दिवसभर सुरू असणाऱ्या या चतु:शत शताब्दी महोत्सव सांगता प्रसंगी समाजातील सर्व मान्यवर समाजसेवक बंधू-भगिनी, पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी,उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी,धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी,उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी,किशोर पुंडलिक चौधरी,भाऊसाहेब चौधरी वरखेडी,किरण श्रीराम बागुल,अतुल सुरेश वाघ,गजानन एकनाथ चौधरी,अमोल हिरामण चौधरी, मुकेश श्रीराम चौधरी, महेश दौलत चौधरी,गजेंद्र फुलचंद चौधरी,राकेश पुंडलिक चौधरी,श्याम रामदास चौधरी,राजेंद्र भाईदास चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

.jpg)
Post a Comment
0 Comments