पाचोरा। -:- प्रतिनिधी --:तहसील परिसरात दलालांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांची लूट होताना दिसत आहे.विविध योजनांची कागदपत्रे तयार करून मंजूर करण्यासाठी आलेल्या स्त्री
,पुरुष, विद्यार्थी, वृद्ध,शेतकरी यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन काम करून देतो म्हणत लूट करीत असून प्रशासनाने बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त होत आहे. याबाबत माहिती अशी की,नागरिकांना विविध प्रकारचे दाखले व शासकीय कागदपत्र तयार करण्यासाठी अधिकृत स्टॅम्प वेंडर कडून योग्य फी देऊन कागदपत्रे तयार करून घेतली जातात. त्यांचेवर शासनाचा अंकुश असतो.मात्र पाचोरा तहसील परिसरात
अधिकृत मुद्रांक विक्रेत्यां पेक्षा दलालांचीच चलती दिसून येत आहे.आम्हीच स्टॅम्प वेंडर आहोत असे भासवून नागरिकांकडुन कागदपत्र घेऊन फायली फिरवल्या जात आहेत.त्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात असून नागरिकांची लूट होत आहे.यामुळे अधिकृत स्टॅम्प वेंडर बदनाम होत आहे.
नागरिकांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, प्रतिज्ञापत्र, डोमेसीयल दाखले,तसेच नोंदणी साठी तयार करण्याचे दस्तऐवज, रेशनकार्ड, आधारकार्ड,यासह विविध दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात यावे लागते.अधिकृत मुद्रांक विक्रेत्यांना स्वतंत्र बैठक व्यवस्था नसल्याने दलालांना चांगलेच फावले
आहे.एकाच ठिकाणी तहसील आवाराच्या बाहेर गर्दी करून नागरिकांना गाठले जाते.अज्ञानी व माहीती नसलेले नागरिक स्त्री पुरुष वृध्द यांना गाठून रेशनकार्ड, आधारकार्ड, लाडकी बहीण योजना, संजय गांधी प्रकरणे, प्रतिज्ञापत्र, नोंदणी चे दस्त आदी कागदपत्र तयार करण्यासाठी जास्तीचे पैसे घेऊन साहेबांकडून लवकर कामे करून देण्याच्या बहाण्याने लूट केली जात आहे.यामुळे तहसील चे नाव देखील बदनाम होत आहे.
रेशनकार्ड प्रकरणासाठी दीड ते दोन हजारांची मागणी दलाल करीत असून लोक मोफत धान्य, योजनांसाठी पैसे देऊन दलालाकडून कामे करून घेताना दिसत आहे.पुरवठा विभागात दलाल सक्रिय असून त्यांचीच कामे होत असल्याचे दिसून येत आहे.
ऑनलाइन प्रकरणे करण्याच्या नावाखाली देखील प्रचंड लूट होत असून यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे या प्रकारांमुळे दिसून येत आहे.यावर प्रांताधिकारी तहसीलदार या जबाबदार अधिकाऱ्यांनी वचक बसवावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
एस एस भारस्कर-- दुय्यम निबंधक वर्ग २ पाचोरा--पाचोरा तहसील आवारात २० अधिकृत परवाना धारक स्टॅम्प वेंडर आहेत.त्यांचेवर आमचे नियंत्रण असते.शासकीय कागदपत्र दस्तऐवज माहितगार स्टॅम्प वेंडर कडून करायला हवे.
पाचोरा तालुक्यातील होणारी जनतेची लूट
शासकीय प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या वेळीच लक्षात
येऊन वरील घटनेची चौकशी होऊन अनाधिकृत वेंडर (दलाल) यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी अशीच जनतेची मागणी आहे,

Post a Comment
0 Comments