दिशा लाईव्ह न्यूज --::- खान्देश तेली समाज मंडळ आयोजित चतु:शत शताब्दी महोत्सव सांगता समारंभ व संताजी महाराज यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्ताने रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून त्यामध्ये सकाळी साडेआठ वाजता रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.
श्री संताजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर लगेचच मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येईल.यावेळी सर्व समाजसेवक बंधू-भगिनी, पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे.तसेच जे रक्तदाते रक्तदानासाठी इच्छुक असतील त्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
रक्तदान शिबिर हे धुळे शहरातील राजवाडे बँकेजवळच्या गुरु-शिष्य स्मारकाजवळ आयोजित करण्यात आलेले आहे याची सर्व समाजसेवक बंधू भगिनी व रक्तदात्यांनी नोंद घ्यावी ही विनंती.

Post a Comment
0 Comments