दिशा लाईव्ह न्यूज। -:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ३:० टर्म च्या टीमचे खाते वाटप जाहीर झाले असून जिल्ह्यातील मा.ना.गिरीश महाजन(जलसंपदा) मंत्री यांचे आपल्या जामनेर मतदार संघात मोठ्या थाटात पुष्प वृष्टी करत स्वागत करण्यात आले.
भाजपाचे संकतमोचक मा.ना. गिरीश भाऊ महाजन यांचे जामनेरात शहरात काल संध्याकाळी जोरदार भव्य – दिव्य स्वागत करण्यात आले.
कार्यकर्ते दुपारी २ वाजेपासून गिरीश भाऊ महाजन यांच्या आगमनाची वाट पहात होते.. शेवटी संध्या.६:३० वाजच्या सुमारास त्यांचे आगमन जामनेरात झाले.
आय टी आय जळगांव रोड येथून ना. गिरीश भाऊ महाजन यांची वाजत गाजत ढोल ताश्याच्या गजरात भव्य दिव्य अशी स्वागत मिरवणूक काढण्यात आली. सोबत फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
स्वागत मिरवणुकीत लाडक्या बहिणींनी ना.गिरीश भाऊ महाजन यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा रूपी आशीर्वाद दिले.मिरवणूक डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौकात आल्या नंतर मंत्री महोदयांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले नंतर राजमाता जिजाऊ चौकात जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वागत मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थीत होते.
Post a Comment
0 Comments