दिशा लाईव्ह न्यूज -:- फत्तेपुर ता.जामनेर येथील शेतकरी दिलीप पंडित चौधरी यांची आज दि.14 रोजी सकाळी 2.30 वाजेच्या दरम्यान गोद्री रोड वरील वाड्यातून बैल जोडी चोरीला गेली आहे.बैलजोडीची अंदाजे किंमत 70 हजार रुपये असल्याचे शेतकरी दिलीप चौधरी यांनी सांगितले.
अगोदरच शेतकरी कर्ज बाजाराने त्रस्त आहे.शेती मालाला भाव नाही. त्यातच हे चोरीचे संकट.
सध्या खरीप हंगामाचे दिवस असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे गुरे,धान्य हे शेतातच असतात. फत्तेपुर परिसरात पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढले आहे.
लवकरात लवकर पोलिसांनी या चोरांचा तपास करावा.अशी विनंती शेतकऱ्याने केली आहे.
थोडी माहिती घेतली असता चोर हे गोद्री मार्गे केल्याचे कळते. तसेच त्यांनी बुलोरो गाडी चोरी करतांना वापरल्याचे सी सी टीव्हीत दिसते.
तरी फत्तेपुर पोलीस यांना हे आव्हानच असेल.त्यांनी त्वरित चोरट्यांचा बंदोबस्त करावा.अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
वरील बैलजोडी कोणाला आढळल्यास फत्तेपुर पोलीस स्टेशन व शेतकरी दिलीप चौधरी यांचेशी संपर्क साधावा.
Post a Comment
0 Comments