Type Here to Get Search Results !

जि. प.अंधारी येथील श्री संजय जगताप या आदर्श शिक्षकाने दिलेला शब्द पूर्ण केला.


 दिशा लाईव्ह न्यूज---  :---  जि. प. प्रशाला अंधारी, ता. सिल्लोड, जि. छ. संभाजीनगर या शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री संजय जगताप  (लोहारा, ता. पाचोरा-रहिवाशी )नी 30 पर्यंत पाढे पाठांतर करणाऱ्या विदयार्थ्यांना 100 रु किमतीची कंपास पेटी देऊ असे विद्यार्थ्यांना शब्द दिला होता. 26 जानेवारी 2025 पर्यंत तब्बल 94 विद्यार्थ्यांनी पाढे पाठांतरात यश मिळविल्याबद्दल श्री संजय जगताप यांनी प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 9400 रु किमतीचे शालेय साहित्य स्वखर्चाने वाटप केले.



 विद्यार्थ्यांना पाठांतराची सवय लागावी, तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न केल्याबद्दल. प्रजासत्ताक दिनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपक्रमशील शिक्षक श्री संजय जगताप यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.या प्रसंगी अंधारी गावाच्या सरपंच श्रीमती नलूताई तायडे, उपसरपंच श्री डॉ. मनोहर गोरे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एकनाथजी जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments