( कृष्णा पाटील -तोरणाळे.)
दिशा लाइव्ह न्यूज --::-- जामनेर- ग्रामीण भागातील वेगवेगळ्या कारणाने रस्त्याचे वाद दिसतात. रस्ते आडवल्यांने त्यांचे मानसिक, आर्थिक, नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागते त्यामुळे प्रलंबित वाद मिटवण्यासाठी तोरणाळे येथील शेतकरी नारायण सरदार सिंग पाटील, सुरत सिंग चहाला सिंग पाटील, गजानन सरदार सिग पाटील त्यांची जमीन अनाड शिवार सोयगाव तालुक्यामध्ये असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला 198,200,201 गट नंबर जाण्या येण्यासाठी गाडी रस्त्याची मागणी सोयगाव येथील तालुकादंडाधिकारी यांना केली असता. आमच्या शेतातून रस्ता नाही अशी तक्रार मनोज विक्रम सिंग पाटील यांनी सुद्धा केली आहे.
तालुकादंडधिकारी यांनी शेतकऱ्यांना बाजूने निकाल दिल्याने मनोज पाटील यांनी सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी त्यांच्याकडे अपील दाखल केल्यानंतर त्यांनीही शेतकऱ्यांचा बाजूने निकाल दिला.
अंबलबजावणी करून रस्ता मोकळा करून देण्यासाठी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तलाठी जाधव आप्पा, तलाठी शेलेकर आप्पा, तलाठी पिराणे आप्पा, तलाठी नागपुरे आप्पा यांच्या सह बंदोबस्तासाठी आलेले बिट जमादार मिरखा तडवी, अमलदार शिवदास गोपाळ, महिला अंमलदार कविता मिस्तरी यांच्या सहकार्याने वर्षानुवर्षेपासून बंद असलेला शेतकऱ्यांचा रस्ता मोकळा करून देण्यात आला.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मालवाहतूक व कामगिरीचे प्रश्न मार्गी लागून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Post a Comment
0 Comments