शंकर भामेरे-पहूर ता जामनेर -
दिशा लाईव्ह न्यूज -:- शहीद वीर जवान जयवंत दिलीप परदेशी यांच्या अपघाती निधनाने दोंदवाडे गाव व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की,भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले गणर जयवंत दिलीप परदेशी GNR (Aarmy no-21022154x) हे आपल्या आजी-आजोबांच्या भेटीसाठी श्रीरामपूर येथे गेले असताना १६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ८ वाजता रेल्वेची धडक लागल्याने रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन इन्स्पेक्टर नितीन देशमुख यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची नोंद घेतली व जवानाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर येथे पाठवण्यात आले. त्यानंतर कायदेशीर सोपस्कार करून सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले. ते कलकत्ता येथे सैन्य दलात कार्यरत होते.
अपघाता वेळी गणर जयवंत दिलीप परदेशी सुट्टीमध्ये श्रीरामपूर येथे जात असताना अचानक समोरून येणाऱ्या गाडीची धडक लागल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस अधिकारी भडकवाड यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांनी भारतीय सैन्यदल कलकत्ता येथे व त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा दिली. त्यानंतर त्यांचे कुटुंब पार्थिव घेण्यासाठी श्रीरामपूर येथे दाखल झाले असता भारतीय सैन्य दलातील जवानांनी व महाराष्ट्र पोलीस विभागाकडून सन्मानपूर्वक मानवंदना देत त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या राहत्या गावी दोंदवाडे तालुका जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी १७ जानेवारी २०२५ रोजी शासकीय इतमामात करण्यात आला.
या दुर्दैवी घटनेबाबत नामदार गिरीश महाजन (मंत्री.महाराष्ट्र राज्य) व साधनाताई महाजन नगराध्यक्षा जामनेर यांच्याकडून कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली .
वीर जवान जयवंत परदेशी ही आपल्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती त्यांच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा त्यांचा परिवार आहे.
Post a Comment
0 Comments