Type Here to Get Search Results !

३०० वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या मायजी देवी यात्रोत्सवाला आज पासून प्रारंभ!


दिशा लाईव्ह न्यूज -:-  यशवंत पवार नांद्रा  -:-तीनशे वर्षाची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक माहिजी देवी यात्रेला पौष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दि.१३ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे सालाबादप्रमाणे यावर्षीही नवस, जाऊळ, निमसाळा देवीला नवसाला पावण झाल्यामुळे नवस फेडण्याची प्रथा आजही भाविक वर्गातून सुरू आहे.

 या ऐतिहासिक माहीजी देवीची पादुकां पूजन व पालखी सोहळा व भव्य मिरवणूक आज दि.१३ रोजी सकाळी ५. वा. आ. किशोर पाटील व सौ. सुनीताताई किशोर पाटील सपत्नीक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आहे.

गिरणा तीरावर असलेले या मंदिराला एरंडोल तालुक्याला जोडण्याचे काम आतापर्यंत एका होडीने सुरु आहे .परंतु आता त्या ठिकाणी भव्य असा पूलही मंजूर झाला असून त्यामुळे धुळे जळगाव जिल्ह्याचा अंतर कमी होणार आहे. म्हणून या दोन तालुक्यांना जोडण्याचा काम करणाऱ्या या पुलाच्या अनुषंगाने पुढे धुळे मुंबई महामार्ग हि भविष्याच्या दृष्टिकोनातून बाजारपेठेसाठी दळणवळणासाठी सोयीस्कर होणार आहे.

 या गिरणा नदी- वर या ऐतिहासिक मायजी देवीच्या पर्यटन तीर्थक्षेत्र मंजूर होण्यासाठी ही विशेष प्रयत्न सुरू आहेत. तसेच काही दिवसापूर्वीच या भव्य मंदिराचा कलश स्थापना कार्यक्रम संत-महंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यामुळे आता संपूर्ण मंदिराची शोभा ही वाढली असून ते ऐतिहासिक जागृत देवस्थान ही निर्माण झाले आहे.

 या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त नवसाला पावण होणारे देवी म्हणून या ठिकाणी नवस मानून व फेडण्यासाठी येत असतात.

 याठिकाणी उद्योग व्यवसायात, गृहशांती, प्रपंच व कौटुंबिक सुख, लावावे म्हणून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी पौष पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर येऊन आपली मनोकामना पूर्ण करतात व नवस फेडतात. यात्रेला ऐतिहासिक महत्व असून शेकडो वर्षांपूर्वी ही यात्रा बारा महिने चालत होती.

 या गावाला अगोदर चिंचखेडा असे संबोधले जायचे परंतु तत्कालीन वेळी देवीचा साक्षात्कार झाला व देवी माय प्रकटली म्हणून मायजी हे नाव पडले आहे.


Post a Comment

0 Comments