दिशा लाईव्ह न्यूज -:- शंकर भामेरे, पहूर , ता . जामनेर ( २२ ) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या केबल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत .
गेल्या काही दिवसांमध्ये पहूर परिसरात शेत शिवारातील चोऱ्यांमध्ये वाढ झाली होती .
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली होती .
पहूर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात केबल चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक करून वीस हजार रुपये किंमतीची तांब्याची तार जप्त केली .
पहुर पोलिस स्टेशन येथे फिर्यादी सुधाकर देवराम जाधव व इतर शेतकरी यांच्या दि.21/09/2024 च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विहीरीतील मोटारच्या व सोलरच्या केबल चोरुन नेलेवरुन पहुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजी नं.346/2024 भान्यासं कलम 303(2) प्रमाने दाखल गुन्ह्यात
पोलीसांनी सखोल तपास करुन तांत्रीक बाबी व गुप्त बातमीच्या आधारे शेख मोहम्मद शेख शब्बीर (वय ४२ )वर्ष रा . नेरी दिगर ता जामनेर यास अटक केले आहे व त्याच्यकडुन 20000 रु किंमतीचे वायर जाळुन तयार केलेले तांबेच्या वायर जप्त करण्यात आल्या आहेत.सदर गुन्ह्यात सहभागी आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून पहुर पोलिस स्टेशन हद्दीतील शेतकऱ्यांच्या केबल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक डॅा .महेश्वर रेड्डी , पोलिस अधीक्षक कविता नेरकर , उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे , पोलीस निरीक्षक सचिन सानय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते पोहेकॅा दिपक सुरवाडे.पोना राहुल पाटील..पोना ज्ञानेश्वर ढाकरे.पोकॅा विनोद पाटील , गोपाल गायकवाड,राहुल पाटील.स्थानिक गुन्हा शाखा कडील ईश्वर पाटील,राहुल महाजन यांनी केली .
सदर शेतकऱ्यांच्या केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने व आरोपीस अटक केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
Post a Comment
0 Comments