दिशा लाईव्ह न्यूज -:- आज संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान जळगाव जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे बोगीला आग लागल्याच्या अफवेने जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या.
मात्र त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये 10 च्या वर प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सविस्तर वृत्त असे की, पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे चाकातून धुर आल्याने आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उडी मारल्या. त्याच वेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव बंगळुरु एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडले. परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्याने एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या.
त्यामुळे प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे बायका मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला. एक्सप्रेसमधील लोक हादरून गेले. आवाज आणि किंचाळ्या सुरू झाल्या. त्यामुळे 35 ते 40 प्रवाशांनी एक्सप्रेसमधून पटापट उड्या मारल्या. समोरून गाडी येते की नाही याची खातरजमाही त्यांनी केली नाही. तेवढ्यात समोरून बंगळुरू एक्सप्रेस आल्याने बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं. त्यात जवळपास 10 च्या वर मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींची आकडा मिळू शकला नाही.
Post a Comment
0 Comments