Type Here to Get Search Results !

गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या भरधाव 'बोलेरो ' चे टायर निखळले मोठी दुर्घटना टळली ! वाघुर पुलाजवळील काम थंड बस्त्यात . . अपघातांची मालिका सुरूच



दिशा लाईव्ह न्यूज -:- शंकर भामेरे,पहूर , ता . जामनेर ( ता . २२ )  जळगांव -छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एक वरील पहुर येथील वाघूर नदी पुलाजवळील चौपदरीकरणाचे काम थंड बस्त्यात असून वारंवार अपघात घडत आहेत . 

जामनेरहुन शेंदुर्णी कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या बोलेरो  ( क्रमांक एम .एच .१९ सी . वाय .८७७४ ) वाहनाचे जवळील खड्ड्यामुळे टायरच निखळले . निखळलेले टायर सुसाट घरंगळत गेले . अपघात घडतात आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावले . सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र मोठी दुर्घटना टळल्याच्या भावना लोकांनी व्यक्त केल्या . ही घटना आज बुधवारी  सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली . 



                   राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लक्ष देईल काय ?

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या कामाकडे का दुर्लक्ष करीत आहे ? असा सवाल संतप्त नागरिकांकडून सातत्याने विचारला जात आहे . या ठिकाणी अपघात नित्यनेमाचे झालेले आहेत .  स्थानिक लोकप्रतिनिधींनी जनतेच्या  जीवाशीच खेळणाऱ्या या  रस्ता रुंदीकरणाच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे .



Post a Comment

0 Comments