Type Here to Get Search Results !

लोहारा येथील प्रतिभावंत शेतकरी कन्येचा जामनेर व पाचोरा तालुका , शहर तेली समाजातर्फे लोहारा येथील कुमारी पल्लवी चौधरी हिचा सत्कार !! अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष येऊन दिल्या शुभेच्छा!!चौधरी कुटुंबांनी मानले सर्वांचे आभार!



दिशा लाईव्ह न्यूज -:- लोहारा येथील अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील श्री संदीप भगवान चौधरी यांची सुकन्या कुमारी  पल्लवी चौधरी हिने कवित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात B E Civil मध्ये पदवी संपादन करून विद्यापीठातून महाराष्ट्राचे राज्यपाल पी. सी. राधाकृष्ण यांच्या शुभहस्ते दोन सुवर्णपदके मिळवल्याबद्दल  नुकताच मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


पाचोरा व जामनेर तालुका ,लोहारा तेली समाज, तसेच  पाचोरा शहर तेली समाजातर्फे जामनेर तालुक्यातील अनेक मान्यवरांतर्फे, तेली समाजाचे अध्यक्ष, सेवानिवृत्त नायब तहसीलदार, आप्पासाहेब श्री सतीश नारायण चौधरी व पाचोरा शहर तेली समाजाचे सचिव श्री शांताराम सुकदेव चौधरी सर पत्रकार, सहसचिव श्री शरद बाबूलाल चौधरी, सेवानिवृत्त पीएसआय श्री रामदास चौधरी यांच्या शुभहस्ते कुमारी पल्लवी चौधरी हिचा शाल, श्रीफळ, गुलाब, पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.



तसेच जामनेर येथील युवा तालुकाध्यक्ष अजय अशोक चौधरी,  चोपडा येथील तेली समाज अध्यक्ष प्रकाश चौधरी, धरणगाव तालुकाध्यक्ष सुनील भाऊ चौधरी, अनिल गुजर,फत्तेपुर येथील अविनाश वामन चौधरी,डॉ.पराग चौधरी,जामनेर येथील निलेश पाटीलसर,संतोष पाटीलसर,योगेश चौधरी, सोपान चौधरी, शेंदूर्णी येथील समाजरत्न सौ.प्रा. योगिता चौधरी (भगत ),  जामनेर येथील पुंडलिक सोनजी चौधरी, पहुर येथील गणेश सुरळकर, अमोल रमेश बाविस्कर, गारखेडा येथील मा.सरपंच प्रकाश चौधरी, शेंदूर्णी येथील हरिदास दशरथ चौधरी, योगेश भागवत चौधरी, लोहारा येथील कैलास चौधरी, अमृत चौधरी, रामा भगवान  चौधरी, युवराज चौधरी संदीप चौधरी,  विशाल दौलत चौधरी, तर जामनेरचे वासुदेव चौधरी रमणभाऊ। चौधरी, अशोक चौधरी, संतोष चौधरी, महेंद्र चौधरी, शिवाजी चौधरी, दीपक चौधरी, ई मान्यवर कार्यक्रम उपस्थित होते.


शेवटी कु.पल्लवी चौधरी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. 

*********************************************


दिशा लाईव्ह न्यूज.

आपली बातमी काही क्षणात 22 लाख वाचकांच्या पलीकडे!!

संपादक -:- दिनेश सोनजी चौधरी, लोहारा

(मेणगावकर )--/9309918930  / 9881028027



*बस..नाम ही काफी है!!*उत्कृष्ट आणि निवडक मसाल्याचं मिश्रण!!*

*मेणगावकर स्पेशल खडा मसाला-सर्वोत्तम वलोलिटी.*



Post a Comment

0 Comments