दिशा लाईव्ह न्यूज -:- जि प प्रशाला अंधारी तालुका सिल्लोड येथील उपक्रमशील शिक्षक श्री संजय जगताप यांनी पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना दोन महिने अगोदर बे ते 30 पर्यंतच्या पाढे पाठांतराचे चॅलेंज विद्यार्थ्यांना दिले ,जो कोणी 26 जानेवारी 2025 पर्यंत बे ते 30 पर्यंतचे पाढे पाठांतर करेल त्याला शंभर रुपये किमतीची कंपास पेटी बक्षीस मिळेल !
विद्यार्थी चुरशीने पाठांतराला लागले परिपाठाच्या वेळी संबंधित शिक्षकाने पाठपुरावा केला .नोव्हेंबर महिन्यात पाढे पाठांतराचे दिलेले चॅलेंज होते. 2 डिसेंबरला पहिला विद्यार्थी बे ते 30 पर्यंतचे पाढे पाठांतर करून आला.. आठवड्यातून दोनदा परिपाठाच्या वेळी श्री संजय जगताप सर पाढे पाठांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत होते. व पाढे पाठांतर हा स्मरणशक्ती वाढवण्याचा मार्ग आहे त्यामुळे केवळ पाढेच नव्हे तर इंग्रजी शब्दार्थ विरुद्धार्थी, शब्द समानार्थी शब्द ,गणितातील सूत्रे ,विज्ञानातील संज्ञा ,मराठीतील हिंदीतील कविता, पाठांतराची सवय लागेल .यामुळे निश्चितच स्मरणशक्ती वाढल्याशिवाय राहणार नाही अशी प्रेरणात देत होते.
डिसेंबर महिना गेला जानेवारी सुरू झाला 15 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख विद्यार्थ्यांना पाढे पाठांतरासाठी अंतिम तारीख देण्यात आली. 15 जानेवारीपर्यंत तब्बल 80 विद्यार्थ्यांनी बे ते 30 पर्यंतचे पाढे पाठांतर केले व त्यांना विजेता घोषित करण्यात आले.
विद्यार्थ्यांना प्रेरणा दिल्याने विद्यार्थी यशाची शिखर गाठू शकतात या नवोपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री एकनाथ जाधव सर यांनी मार्गदर्शन केले .व श्री अनिल मेश्राम सर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच जि .प .प्रशाला अंधारीच्या सर्व शिक्षक वृंदांचे अनमोल सहकार्य लाभले.
Post a Comment
0 Comments