दिशा लाईव्ह न्युज , शंकर भामेरे , पहूर , ता . जामनेर ( ता . २० ) साहित्यातून समाजाचे प्रतिबिंब उमटते , असे प्रतिपादन प्रा . त्रिशिला तायडे यांनी केले . त्या तालुका साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने आयोजित १५ व्या खान्देशस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या .
यावेळी तावडी बोली भाषेच्या सादरीकरणाने रंगत वाढवली .त्यातल्या त्यात बोलेतील कलाकृतींनी विशेष लक्ष वेधून घेतले. जामनेर येथील स्वर्गीय हिरालाल अमृतला बोहरा साहित्य नगरी येथे संपन्न झालेल्या विविध सत्रांमधून साहित्य विषयक चर्चा आणि मांडणी करण्यात आली.
जामनेर येथील साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने पंधरावे खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.त्रिशीला साळवे तायडे या होत्या . उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे हे होते.
यावेळी व्यासपीठावर तावडी बोलीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक कौतिक कोळी, अनिलकुमार बोहरा व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष प्रा . त्रिशीला साळवे यांनी स्रीवादी लेखिकांनी वस्तुनिष्ठ लेखनातून स्वतंत्र स्थान निर्माण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक डॉ . प्रकाश सपकाळे यांनी आपल्या लेखनाची भूमिका स्पष्ट केली सोबतच बहिणाबाई चौधरी यांची बोली ही तावडी बोली आहे असे प्रतिपादन केले .हाच धागा पकडून डॉ . अशोक कौतिक कोळी यांनी सुद्धा तावडी बोलीतील लिखाणाला प्रोत्साहन देण्यासंदर्भात लेखकांनी जास्तीत जास्त तावडी बोलत लेखन करावे , अशी अपेक्षा व्यक्त केली.
उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी केले . प्रास्ताविक विनोद जाधव यांनी केले. दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. विश्वास पाडोळसे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन संपन्न झाले. या सत्रात राहुल निकम, प्रा.सुरेश पाटील, डॉ.संगीता गावंडे, विजय सैतवाल , शंकर भामेरे यांनी मराठी बोलीतून दर्जेदार कथा सादर करून ग्रामीण जीवनाचे व शेतकरी जीवनाचे दर्शन घडवले.
तावडी बोलीतून संपन्न झालेले कथाकथन सत्र खूपच रंजकदार ठरले. यावेळी विजयी कथा कविता स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. सोबतच काही कलाकृतींचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले. या संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सत्कार घडवून आणला . त्यामध्ये पं. ना. पाटील, संदीप पाचंगे, मोहन सारस्वत, संदीप पाटील, रमेश पाटील यांचा समावेश होता.
बुलढाणा येथील प्रख्यात कवी सुभाष किन्होळकर यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कवी संमेलन संपन्न झाले . यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी डॉ. अशोक कोळी हे उपस्थित होते . यावेळी बोलीभाषेतील तावडी अहिराणी व वैधर्भी बोलीतील सुमारे ४० कवींनी कविता सादर केल्या . कवींनी खास करून ग्रामीण जीवन , आई , कृषी जीवन यावर आपल्या कविता सादर केल्या .
जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने हे एक दिवशीय खानदेश स्तरीय साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले . सुरुवातीलाच सकाळी सारस्वतांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले . यावेळी जामनेर शहरातून ग्रंथ दिंडीला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला . संमेलनाचा समारोप माजी सभापती बाबुराव घोंगडे यांच्या उपस्थितीत झाला . जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात रसिक व साहित्यिकांनी उपस्थिती दिली.
संमेलन यशस्वीतेसाठी जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डी .डी . पाटील, सहसचिव जितेंद्र रामकृष्ण गोरे, सचिव गोरख सूर्यवंशी, विनोद जाधव, शंकर भामेरे, श्रीकांत पाटील, विजय सैतवाल, सैय्यद रशीद, विजय सूर्यवंशी, कृष्णा माळी, अश्विन रोकडे यांनी सहकार्य केले .
Post a Comment
0 Comments