Type Here to Get Search Results !

पोलीस आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू.-:- स. पो .नि .प्रकाश काळे ,पिंपळगाव हरे.


सुनील लोहार -कुर्हाड.

 दिशा लाईव्ह न्यूज -:-  _सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त पिपळगाव हरे. पोलीस स्टेशन येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. 

पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रिंट  व वेब पोर्टल  मीडियाच्या  पत्रकार बांधवांना आमंत्रित करण्यात आले होते.  कार्यक्रमात सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, प्रकाश पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक अरविंद मोरे यांच्या हस्ते सर्व पत्रकार बांधवांना डायरी, पेन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमात पत्रकार दिनाची प्रस्तावना ज्येष्ठ पत्रकार किशोर लोहार यांनी मांडली. तसेच युवा  पत्रकार सुनील लोहार यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात एखाद्या  बेधडक वृत्ताचे संकलन किंवा खरी वस्तुस्थिती पत्रकारांना समाजापुढे मांडावी लागते. अनेक वेळा अशा बातम्यांमुळे पत्रकार हा असुरक्षित दिसून येतो.अशा वेळी जसे पत्रकार बांधव पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करीत असतात तसे पोलिसांनी सुद्धा पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी सजग असायला हवे असे मत व्यक्त केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष सपोनी प्रकाश काळे यांनी पत्रकारांविषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत्रकार आणि पोलीस ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. अनेक पत्रकार बांधव आम्हास कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वेळोवेळी मदत करीत असतात.  तसेच पत्रकारांवर होणारे अन्याय देखील कदापि सहन करणार नाही असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार दिलीप जैन,किशोर लोहार, रविशंकर पांडे, हेमशंकर तिवारी, सुनील लोहार ,गजानन लाधे,चंद्रकांत माहोर , बालचंद्र परदेशी,इसा तडवी ,दीपक मुलमुले, सतीश गोपाळ रोशन जैन,दिलीप पाटील आदी पत्रकार व पोलीस  बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments