Type Here to Get Search Results !

जामनेर येथील गोपद्म शेतकरी कंपनीला दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे निमंत्रण.


दिशा लाईव्ह न्यूज -:- जामनेर येथील गोपद्म फेड शेतकरी उत्पादक कंपनीला दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे निमंत्रण आले आहे.


कंपनीच्या पदाधिकारी यांना सहकुटुंब दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासा मान मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. कंपनी शेतीमालाचे मूल्यवर्धन करते. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारने दाखल घेत हे निमंत्रण दिले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन लोखंडे, संचालक प्रदीप महाजन, शरद खोडपे, विशाल राजपूत आदींना येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत लाल किल्ल्यावर आयोजित ध्वजवंदन सोहळ्यात पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे पत्र आले आहे. 

या सोहळ्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री व नाफेडच्या वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत बैठक होणार आहे.

Post a Comment

0 Comments